Bhau Chaudhari : शिंदे गटात प्रवेश होताच भाऊंचे डोंबिवलीत जंगी स्वागत

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने फटाक्यांची आतिष बाजी करत बँड वाजवत केले स्वागत
bhau chaudhari join cm eknath shinde group shiv sena politics mumbai
bhau chaudhari join cm eknath shinde group shiv sena politics mumbaisakal

डोंबिवली - ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे खंदे समर्थक नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी बुधवारी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथम ते शुक्रवारी डोंबिवलीत परतले असता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिंदे गटात आतापर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला मात्र भाऊ यांचे फटाक्यांची आतिष बाजी करत बेंजो लावत स्वागत करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या स्वागताची चर्चा रंगली होती.

बऱ्याच वर्षानंतर शिवसेना शाखेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊ चौधरी यांनी बुधवारी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर ते प्रथमच शुक्रवारी डोंबिवली मध्ये आले. डोंबिवलीत बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती शाखेत भाऊ यांची फटाक्यांची आतिष बाजी करत व बेंजो लावत स्वागत करण्यात आले. भाऊ यांचे जुने मित्र महेश पाटील यांनी त्यांची गळाभेट घेत स्वागत केले. यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे हे देखील उपस्थित होते. नागपूर येथे त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने टीवन नागपूरची संत्रा बर्फी भरवण्यात आली. यावेळी बोलताना भाऊ म्हणाले,

शहर शाखेत भावनिक असे वातावरण आज पहायला मिळाले. जुने सहकारी मला भेटले आणि पुन्हा ज्याप्रमाणे मी पूर्वी शहर शाखेत काम करत होतो. त्याप्रमाणे पुन्हा सगळ्यांसोबत काम करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्या कामाची पद्धत माहीत आहे. त्यांना जे योग्य वाटेल ती जबाबदारी आता मला ते देतील. गेले चार पाच वर्षे नाशिक ग्रामीण भागात मी काम पाहिले आहे. शहर आणि ग्रामीण भाग दोन्ही ठिकाणी काम मला अनुभव आहे. त्यामुळे मला जी जबाबदारी दिली जाईल त्या ठिकाणी मी काम करायला तयार आहे असे म्हणाले.

गोग्रासवाडी येथील भाऊ यांचे जुने मित्र महेश पाटील हे पूर्वी भाजपा मध्ये होते. एका आंदोलन दरम्यान महेश पाटील यांनी भाऊ यांच्या चेहऱ्याला काळे फसले होते. याविषयीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याने भाऊ म्हणाले त्याचे स्पष्टीकरण देखील मी देतो. 1995 पासून आम्ही एकत्र काम करत आहोत. त्यावेळी आम्ही आमच्या पक्षाची बाजू मांडत होतो आणि त्यात गैर काही नव्हते असे मला वाटत. आज ही आम्ही मांडीला मांडी लावून बसत असून या शिवसेना वाढीसाठी जे काही काम करावं लागेल ते मी करेल असे ते म्हणाले.

मी आजही शिवसेनेसाठी काम करत असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले. मी कधीही कोणत्या पदासाठी काम केले नाही आजही मी कोणतीही अपेक्षा बाळगत नाही. मी एक तळागाळातील कार्यकर्ता असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ग्रामीण भागात देखील अनेक वर्षांपासून रखडलेली कामे या सरकारच्या काळात झपाट्याने होत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेन असे त्यांनी यावेळी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com