ठाणे : शहराच्या पूर्व भागात म्हणजेच कोपरीत राजस्थानमधील भिलवाडा पॅटर्न राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील रहिवाशांनी दाखवलेली सर्तकता यामुळेच आता हा पॅटर्न यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवांसाठी येथील नागरिकांना घराबाहेर पडावे लागत नाही, कारण प्रत्येक गल्लीत जवळच्या दुकानदारांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना घरपोच सेवा मिळत आहे..
नक्की वाचा : बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचा संघर्ष
ठाण्यातील अनेक भागांत कोरोनाचा रुग्ण आढळून येत असला, तरी कोपरी त्यापासून दूर आहे. यासाठी पोलिस दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. तसेच नागरिकांनी स्वत: यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंग या नियमाचे पालनही केले जात आहे. तसेच या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवरदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.
महत्वाची बातमी : कोरोनाच्या फैलावानंतर मुंबईतील गुन्ह्यांमध्ये 67 टक्क्यांनी घट
राजस्थानमधील भिलवाडा भागातही एकाच दिवशी कोरोनाचे 14 रुग्ण आढळल्यानंतर "रॅपिड ऍक्शन' घेत विविध उपाय योजले होते. त्यानंतर 2 एप्रिलनंतर या भागात नवा कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. भिलवाडाचा हाच पॅटर्न आता कोपरीतही राबवला जात आहे. नागरिकांनी दाखवलेल्या सजगतेमुळे हा पॅटर्न यशस्वी होताना दिसत आहे.
हे ही वाचा : गोरगरिबांसाठी नगरसेविका बनल्या भाजी विक्रेत्या!
नागरिकांना अत्यावश्यक सेवा दूरध्वनीवर घरपोच मिळत आहेत. आनंद नगर, बारा बांगला, सिडको बोगदा, हरिओम नगर चेक नाका या ठिकाणी आता पोलिसांची गस्त ठेवावी. पोलिस बळ कमी पडत असेल तर त्यासाठी आमचे स्वयंसेवक तैनात ठेवता येतील. यासंदर्भात निवेदन ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहे.
- भरत चव्हाण, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.