Bhiwandi Building collapses: भिवंडीत बिल्डिंग कोसळून 2 जणांचा मृत्यू, पाच जखमी

Bhiwandi Building collapses
Bhiwandi Building collapses
Updated on

मुंबई- भिवंडीतील दोन मजली बिल्डिंग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. शहरातील गौरीपाडा परिसरातील ही घटना असून रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. माहितीनुसार, यात दोन जणांचा मृत्यू झालाय. चार जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे.

दोन मजली इमारतीचा मागच्या भाग कोसळल्याची माहिती आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार लोकांना स्थानिकांनी बाहेर काढलं. त्यानंतर अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. यावेळी आणखी सहा जण ढिगाऱ्याखाली असल्याचं त्यांना समजलं. मोहीम हाती घेऊन अग्निशामक दलाच्या जवांनानी चार जणांना सुखरुप बाहेर काढलं, तर दोन जणांचा मृत्यू झाल्याचं आढळलं.

Bhiwandi Building collapses
साडवली-सुयोग रहाटेला कार्टुनिंगमध्ये मुंबई विद्यापिठाचे सुवर्णपदक

जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. माहितीनुसार, एकाची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याने मदतकार्यासाठी अडचण आली. काही दिवसांपूर्वीच भिवंडीमध्ये एक बिल्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे येथील लोक जीव मुठीत घेऊन जगत असल्याची स्थिती आहे.

Bhiwandi Building collapses
Weather Update: राज्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई-पुण्यातही संततधार सुरू

गौरीपाडा येथे असलेल्या बिल्डिंगला बांधून ४० ते ४५ वर्षे झाल्याचे सांगितले जाते. भिवंडी महानगरपालिकेने या बिल्डिंगला दोन वेळा नोटीस दिल्याची माहिती आहे. बिल्डिंगच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. बिल्डिंग धोकादायक आहे म्हणून महानगरपालिकेने नोटीस दिली. पण, गांभीर्य लक्षात घेऊन लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं नाही. त्यामुळे बिल्डिंग कोसळली अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.