Bhiwandi Crime: त्या दोन तडीपार गुंडांना पोलिसांनी भिवंडीत केली अटक

Latest Crime News: दोघा आरोपींना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली |
Bhiwandi Crime: त्या दोन तडीपार गुंडांना पोलिसांनी भिवंडीत केली अटक
Updated on

Bhiwandi Crime: शहरातील दोन आरोपींना पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार हद्दपार केले असतानाही ते दोघेही भिवंडीत दिसून आल्याने या दोघांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. राहुल दशरथ राठोड (वय २१, रा. अंजूर फाटा, रातनगर), वैभव गोपाळ पवार (वय २४, रा. साठेनगर, भिवंडी) अशी अटक तडीपार गुंडांची नावे आहेत.

Bhiwandi Crime: त्या दोन तडीपार गुंडांना पोलिसांनी भिवंडीत केली अटक
Bhiwandi Crime: अज्ञात चोरट्यांकडून दोन लाखांची चोरी; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

आरोपी राहुल व वैभव याला भिवंडी परिमंडळ दोनच्या तत्कालीन पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार २ एप्रिल २०२४ रोजी ठाणे शहर पोलिस आयुक्तालय, बृहन्मुंबई, नवी मुंबई, पालघर, रायगड व पुणे जिल्हा आदी क्षेत्रांतून दोन वर्षांच्या कालावधीकरिता तडीपार करण्यात आले होते; मात्र असे असतानाही राहुल व वैभव हे वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी (ता. ११) रात्री साठेनगर परिसरात पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. दोघा आरोपींना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Bhiwandi Crime: त्या दोन तडीपार गुंडांना पोलिसांनी भिवंडीत केली अटक
Bhiwandi News: भिवंडी दगडफेक प्रकरण; पोलीस उपायुक्तांची बदली, तणाव योग्य पद्धतीने न हाताळल्याचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.