Sharad Pawar : देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना ४०० हुन अधिक जागा हव्यात

देशाची घटना बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ४०० हुन अधिक जागा पाहिजे असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी केला.
sharad pawar
Sharad Pawar esakal
Updated on

ठाणे - देशाची घटना बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ४०० हुन अधिक जागा पाहिजे असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी केला. भिवंडी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी हा आरोप केला.

देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना पुन्हा संधी मिळाली तर, मतदानाचा अधिकार संकटात येईल असा आरोप देखील शरद पवार यांनी केला. तसेच यंदाची निवडणूक नेहमीच्या निवडणूकीपेक्षा वेगळी आहे. या निवडणूकीत तुमचे-माझे भवितव्य काय असणार आहे, याचा निर्णय होणार आहे.

त्यांचे खासदार, पदाधिकारी जाहीरपणे घटना बदलण्याबद्दल वक्तव्य करत आहेत, त्यामुळे देशाची घटना बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकाऱ्यांना ४०० पेक्षा अधिक जागा पाहिजे असल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार संकटात येईल. त्यादिवशी लोकांच्या अधिकाराचे अस्तित्त्व नष्ट होऊन या देशात मोदींच्या नेतृत्वाखाली हूकूमशाही सुरू झालेली दिसेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. माझी दोन राज्यात सरकार आहे. परंतु त्यांच्याकडे ताकद, सत्ता आहे. दिल्लीत बदल घडविला म्हणून मला कारागृहात पाठवले. मोदींना गरीबांच्या मुलांनी शाळेत जावे, चांगले आरोग्य मिळावे असे वाटत नाही. मी ५०० शाळा बनविल्या म्हणून तुम्ही मला कारागृहात टाकले हा अतिशय छोटा विचार आहे.

मी दिल्लीत सर्वांना औषधोपचार मोफत दिले. कारागृहात गेल्यानंतर माझ्यावरील औषधोपचार बंद करण्यात आला. मला मधुमेहाचा त्रास आहे. मला माहीती नाही त्यांना काय करायचे होत, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. शरद पवार यांना भटकती आत्महा म्हणणे किती अयोग्य आहे. उद्धव ठाकरे यांना नकली संतात म्हणतात. हा मराठी माणसाचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.