Thane News: भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोणगाव जिल्हा परिषद गटातून एक रुपयाचे काम झाले नाही असे वक्तव्य येथील खासदार तथा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले. याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे यांनी त्यांना थेट चॅलेंज दिले आहे.
बाहेरून बोलायचं सोडून द्या. वेळ, जागा आपण ठरवा, मी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी पोहोचेल. एकदा समोरासमोर बसूया होऊन जाऊ दे काय असेल तो सोक्षमोक्ष असे म्हात्रे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीने अद्याप याठिकाणी आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी म्हात्रे यांनी थेट पाटलांना ललकारून निवडणूकीच्या रिंगणात भिडण्याचे आव्हान केले आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री तथा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून आपण विजयाची हट्रिक करू असा आत्मविश्वास मंत्री पाटील यांना आहे.
महाविकास आघाडीने अद्याप येथील आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे तर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होण्याआधीच भाजपचे कपिल पाटील व राष्ट्रवादी पवार गटाचे म्हात्रे यांच्यात विकास कामांवरून शाब्दिक लढाई सुरू झाली आहे.
एका कार्यक्रमात युतीचे उमेदवार पाटील यांनी कोणगाव जिल्हा परिषदेतून एक रुपयाचे काम झाले नाही असे वक्तव्य केले होते. यावरून थेट समोरासमोर येऊन भिडण्याचे आव्हान म्हात्रे यांनी पाटील यांना केले आहे. त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे. त्यात
म्हात्रे म्हणाले आहेत की, दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी एक वक्तव्य केलं, कोण जिल्हा परिषद गटातून एक रुपयाच देखील काम झालं नाही. आणि झालं असेल तर ते माझ्या समोरासमोर बसायला तयार आहेत. मी कपिल पाटील यांना आव्हान करतो आपण देखील या कोण गटातून 2007 ला जिल्हा परिषदवर निवडून आले होते.
2012 पर्यंत या गटाचे आपण नेतृत्व केले. 2014 ला आपण खासदार म्हणून निवडून आलात. त्यानंतर दहा वर्षात आपण काय केल याचा उहापोह मी नंतर करेल. पण आपण मला आव्हान केलेल म्हणून मी सांगतो की आपण गेल्या आठ दहा वर्षात इथे जे करू शकले नाही. मी 2018 जानेवारीला सभापती झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोणगावची पाण्याची प्रमुख समस्या होती. त्या समस्येचे निराकरण करण्यासाठ जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी 54 लाखाचे पाईपलाईन चे काम मंजूर करून घेतले.
यात विशेष सांगतो कोणचा जो पाण्याचा प्रश्न होता तो असा होता अगोदर ही सरवली एमआयडीसी होती. सरवली एमआयडीसीचे कनेक्शन होते. त्या कनेक्शन नंतर कोण गावचा कनेक्शन होतं, आणि म्हणून ते पाणी कोण गावात प्रेशर मध्ये येत नव्हतं. त्या प्रकारे मी प्लॅनिंग करून एमआयडीसी सरवलीच्या पुढून कनेक्शन घेऊन तशाप्रकारे पाईप टाकून काम केलं.
ज्यावेळेस ते जोडणीचे काम आलं त्यावेळेस कपिल पाटील आपण स्वतः राजकीय स्वार्थापोटी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, फक्त आणि फक्त माझ्या विरोधासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एमआयडीसी अधिकाऱ्यांवर दबाव आणून हे पाईपलाईनची जोडणी करून दिली नाहीत. आजही मी आपल्याला आव्हान करतो मी ते बोलतो तसे पाण्याची पाईपलाईन जोडल्यानंतर जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे तेवढे पाणी मुबलक प्रमाणात कोण गावात मिळेल.
खासदार साहेब मी पाण्याचा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही खोडा घातला राजकीय स्वार्थ पोटी तुम्ही हे काम होऊ दिलं नाही. एमआयडीसीचा टॅब लावून दिलेला नाही. आजही 54 लाखाची पाईपलाईन टाकलेली आहे ती धुळखात पडलेली आहे. अशा प्रकारच तुमच राजकारण आहे. तुम्ही सांगताना काय केलं तर खातरजमा करून घ्या कोण गावात पाण्याचा रोजचा एक टँकर माझ्या माध्यमातून जातो. याचा पूर्ण खर्च शासन नाही म्हात्रे करतो. मी जी काही काम या कोण जिल्हा परिषद गटामध्ये केलेली आहेत ती सविस्तर लेखी लिहून देतो.
मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेली काम हीच फक्त दाखवतो. तुमच्यासारखे खोटी, बोगस काम जी आमदारांनी केली, नगरसेवकांनी केली, जिल्हा परिषद विभागाने केली अशी काम दाखवत नाही. कपिल पाटील तुम्हाला आजही माझ चॅलेंज आहे. जर तुम्हाला खासदारकी कळली असेल तर खासदारांची काय काम आहेत केंद्र सरकारकडून आपण काय काय योजना राबवल्या. एकदा आपण समोरासमोर बसू आणि मी आपणासआव्हान करतो आपण शंभर टक्के सपशेल अपयशी ठरलेले आहात. दहा वर्षाच्या कालावधीत आपण एकही बिल पास करू शकले नाही. आपण एकही रेल्वेची समस्या सोडवू शकले नाही. नॅशनल हायवेचे काम केलेले नाही. एकही असा प्रोजेक्ट ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल असा एकही प्रोजेक्ट या लोकसभेत आपण आणलेला नाही.
निफाड येथे भेट देऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून अशा प्रकारचा मॉडर्न बनवून आम्ही त्याला मंजुरी दिली होती. त्याचं उद्घाटन आपण केलं होतं. आणि म्हणून भिवंडीकरांची फसवणूक करू नका. भिवंडीकरांच्या डोळ्यात धुळ फेकू नका. तुम्ही खरंच जर काम केले असतील खासदार म्हणून तर नक्कीच माझ्यासमोर या बसा मी तयार आहे असे म्हात्रे यांनी पाटील यांना आव्हान केले आहे. यावर आता युतीचे उमेदवार पाटील काय उत्तर देतात हे पहावे लागेल.
म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आव्हान करतो. बाहेरून बोलायचं सोडून द्या. वेळ, जागा आपण ठरवा मी तिथे पोहोचेल. कधीही कुठेही असेल तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी पोहोचेल. एकदा समोरासमोर बसू या होऊन जाऊ दे काय असेल तो सोक्षमोक्ष.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी जी काम केले ते दाखवतो. एमएमआरडीएच्या किंवा इतर माध्यमातून केलेले काम दाखवत नाही आणि कपिल पाटील तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. तुमच्या माहितीसाठी सांगतो ती जी योजना आहे ती माझ्या वेळेस मंजूर केलेली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.