Eknath Shinde ; डबल इंजीनचा डबल फायदा ; केंद्राच्या पाठबळामुळे राज्याचा विकास

केंद्र आणि राज्य असे हे डबल इंजीनचे सरकार आहे. त्याचा डबल फायदा लोकांसाठी झाला पाहिजे, ही भावना आपल्या मनात आहे. राज्यात दोन वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत.
Eknath Shinde
Eknath Shinde sakal
Updated on

डोंबिवली : केंद्र आणि राज्य असे हे डबल इंजीनचे सरकार आहे. त्याचा डबल फायदा लोकांसाठी झाला पाहिजे, ही भावना आपल्या मनात आहे. राज्यात दोन वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत. आरोग्य सेवा सुधारत आहे, स्वच्छतेत महाराष्ट्राने बाजी मारली, परदेशी गुंतवणूक येत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र सरकारच्या पाठबळामुळेच राज्याचा चौफेर विकास होत असून आपण भाग्यवान म्हणून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून लाभले अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात रविवारी शासन आपल्या दारी या उपक्रमाचे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, किसन कथोरे, पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. केडीएमसी क्षेत्रातील नव्याने उभारण्यात येत असलेले सूतिका गृह व कर्करोग रुग्णालय, मासळी बाजार, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदन गृह, सुनीलनगर येथे अभ्यासिका, भाजी मंडई, पालिका रुग्णालयात एनआयसीयू विभाग या उपक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामे एमएमआरडीए मार्फत आपण करत आहोत. येथील खासदार डॉक्टर असल्याने अनेक सुविधा देता येत आहेत. त्यांचे तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांनी आपले आरोग्य मंत्री यांना खास सूचना दिल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये आरोग्यासाठी काही कमी पडता कामा नये. त्यांना जी जी काही मदत पाहिजे ते देण्याचं काम करा. शेवटी राज्य आणि केंद्र सरकार हे मिळून डबल इंजिनच सरकार आपण काम करतोय. डबल इंजिनचा डबल फायदा आपल्या लोकांना झाला पाहिजे. आणि हीच भावना आणि भूमिका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे.

दीड पावणे दोन वर्षांमध्ये अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले. त्यामुळे शेतकरी, कामगार, माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ सगळ्याना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण काम करतोय. आपल्या सरकारने 75 हजारची भरती जाहीर केली. 75 पेक्षा 1 लाख 60 हजार वरती भरती केली हा निर्णय घेणार आपलं पहिल सरकार आहे. आणि म्हणून परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येते आहे. त्या माध्यमातून देखील जवळपास तीन ते चार लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आपल्या स्किल डेव्हलपमेंट लोढा डिपार्टमेंट मधून देखील मोठ्या प्रमाणावर आपण रोजगार मिळतोय.

Eknath Shinde
Dombivli Crime News : गुटख्याच्या कारखान्यावर कल्याण गुन्हे शाखेचा छापा ; 17 लाखाचा गुटखा व इतर साहित्य जप्त

आपल्या अर्थसंकल्पात देखील सर्व समावेशक असा प्रतिबिंब उमटलं या राज्यातल्या सर्व घटकांना न्याय देणारा प्रतिबिंब त्यात आहे. म्हणून म्हटलं हे सर्व सामान्यांचे सरकार आहे अस आपण म्हणतो. हे सरकार आल्या नंतर अनेक प्रकल्पांना चालना मिळाली. धाडसी निर्णय आपले सरकार घेत आहे. मराठा आरक्षण दिले, 121 सिंचनाचे प्रकल्प केले मोठ्या प्रमाणात जमीन ओलिता खाली आली, सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. मुंबई गोवा सुपर एक्सस्पेस सुरू करत आहे सर्वाना सरळ मार्गाने आता कोकणात जायला मिळेल. तरुणांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. ठाण्यात हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे हे सरकार आज पडेल उद्या पडेल म्हणणाऱ्या लोकांना तुमच्या कडून ही एक चपराक आहे. हे सरकार मजबूत होत आहे. अजित पवार देखील आपल्या सरकार मध्ये सामील झाले आहेत.

महाराष्ट्र राज्याला स्वच्छते मध्ये 1 नंबर मिळाला आहे.

डीप क्लिन साठी विरोधक माझ्यावर टीका करत होते. मी त्यांना कामातून उत्तर देतो. फेसबुक लाईव्ह करून नाही तर फिल्ड वर जावे लागते. आपण बांधावर जाऊन अश्रू पुसतो मगरीचे अश्रू ढाळत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.