Teachers and Graduate Constituency Election : ‘शिक्षक’, ‘पदवीधर’साठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Teachers and Graduate Constituency Election
Teachers and Graduate Constituency Electionsakal
Updated on

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी १० जून रोजी मतदान होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी घोषित केले.

मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसने तयारी केली आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Teachers and Graduate Constituency Election
Loksabha Election : शांतिगिरी महाराजांच्या भेटीला उमेदवारांची मंदियाळी

आमदारांची निवृत्ती

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे ७ जुलै रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जारी होणार

१५ मे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

२२ मे

अर्जांची छाननी

२४ मे

अर्ज मागे घेण्याची मुदत

२७ मे

मतदान

(सकाळी ८  ते दुपारी ४)

१० जून

मतमोजणी होईल

१३ जून

निवडणूक प्रक्रिया पूर्ण

१८ जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.