शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना मोठा झटका बसला आहे. कारण ईडीनं त्यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांची एकूण १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दापोली येथील साई रिसॉर्टच्या संबंधी ही संपत्ती आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Big blow to Anil Parab ED seized property worth 10 crores)
साई रिसॉर्टशी संबंधीत प्रकरणात ईडीनं अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांची तीन ते चार वेळा चौकशी देखील झाली होती. याप्रकरणी पर्यावरण खात्यानं अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती.
दरम्यान, ईडीच्या चौकशीतून हे समोर आलं आहे की, अनिल परब यांचं सदानंद कदम यांच्याशी सामंजस्य आहे. त्यातूनच कदम यांना स्थानिक एसडीओ कार्यालयातून बेकायदा परवानगी मिळाली. त्यानुसार शेतजमीनीचं बिगरशेत जमिनीत रुपांतर करण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करत रिसॉर्टचं बांधकाम झालं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.