Milind Deora: काँग्रेसला मोठं खिंडार? 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात करणार प्रवेश?

Loksabha Election: मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज मुंबईतील 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Milind Deora
Milind DeoraEsakal
Updated on

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. अशातच महाविकास आघाडीसह महायुतीतील पक्षांनीही एकत्र येत आगामी लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. जागा वाटप, सभा, दौरे यांना सुरूवात झाली आहे. जागावाटपावरून काही ठिकाणी पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अशातच दक्षिण मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच नाराजीतून काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

अशातच काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी (14 जानेवारी ) सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Milind Deora
Sharad Mohol Case: "गेम केला, मास्टरमाईंडला सांगा", शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपीचा फोन कोणाला?

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे .

दक्षिण मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केल्यानंतर देवरा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षनेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ते नाराज आहेत. देवरा यांनी आपल्या समर्थकांना निवासस्थानी बोलावून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा विचार बोलून दाखविला. त्यांचे निकटवर्तीय आमदार अमिन पटेल यांनी मात्र यासाठी असमर्थता दर्शविली.

Milind Deora
Talathi Bharti : 'तो' आरोप सिद्ध न केल्यास रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार; मंत्री विखे-पाटलांचा स्पष्ट इशारा

मुंबईतील १० माजी नगरसेवक, २५ पदाधिकाऱ्यांसह माजी खासदार मिलींद देवरा यांच्या शिंदे गटात प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी खासदार मिलींद देवरा यांचा दुपारी २ वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. ११ वाजता सिद्धीविनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन मिलींद देवरा आपली भूमीका माध्यमांसमोर स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर १० माजी नगरसेवक, २५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे वर्षा बंगल्यावर प्रवेशासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

देवरा यांना शिंदे गटाकडून अद्याप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचे आश्वासन देण्यात आलेले नाही. या मतदारसंघाकरता भाजपही आग्रही असल्याने येणाऱ्या काळात मिलींद देवरा यांच्यावरुन भाजप-शिंदे गटातही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Milind Deora
Maratha Reservation : ओबीसीतून आरक्षण नाहीच; भुजबळ यांची जरांगे यांच्यावर टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.