मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी 'यांची' नावं आहेत चर्चेत

मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी 'यांची' नावं आहेत चर्चेत
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये मोठे पक्षांतर्गत बदल केले जाणार आहेत. सध्या मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून मंगलप्रभात लोढा काम पाहतायत. मात्र लोढा याना हटवून या पदावर मराठी चेहरा शोधण्याचं काम सध्या भाजपकडून केलं जातंय अशी माहिती आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस जर केंद्र गेलेत तर चंद्रकांत पाटलांची देखील विरोधीपक्षनेतेपदी देखील वर्णी लागू शकते. अशात या आधी महाराष्ट्रात भाजपकडून जिल्हावार अध्यक्षांच्या नेमणुका देखील करण्यात येणार आहेत असं बोललं जातंय. 

येत्या १६ फेब्रुवारीला महाराष्ट्र भाजपचं राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाचं उदघाटन भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा करणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत अनेक दिग्ग्जनेते उपस्थित राहणार आहेत.      

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या अधिवेशनात महाराष्ट्र भाजपातील विविध पदासाठी केल्या जाणाऱ्या फेरबदलांवर शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडेच महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ राहील असं बोललं जातंय. दरम्यान भाजपातील एक मोठा गट हा सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांच्याकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपद यावं यासाठी लॉबिंग करतोय असं बोललं जातंय.  

कौन बनेगा 'भाजप मुंबई अध्यक्ष' 

सध्या मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून मंगलप्रभात लोढा काम पाहतायत. अशात मंगलप्रभात लोढा यांच्याऐवजी तरुण चेहरा शोधण्याचं काम पार्टीकडून सुरु आहे. अशात मनोज कोटक, योगेश सागर, पराग अलवणी आणि सुनील राणे यांची नावे चर्चेत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्या आधी आशिष शेलार हे मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. अशात आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं असं देखील बोललं जातंय. येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना भाजप सामोरं जाणार आहे. अशात भाजपाला महाविकास आघाडीचा सामना करावा लागू शकतो. अशात भाजप मुंबई अध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात टाकणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 

big internal changes might take place in BJP maharashtra who will become mumbai president

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.