मोठा खुलासा : उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय हवा चटकन ओळखणारे रामदास आठवले म्हणतात...

मोठा खुलासा : उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय हवा चटकन ओळखणारे रामदास आठवले म्हणतात...
Updated on

मुंबई - महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांपैकी एक नेता म्हणजे RPI चे रामदास आठवले. असं म्हणतात राजकारणाची हवा कुठल्या दिशेला जातेय हे आठवले यांना पटकन समजतं. दरम्यान, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलंय. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. अशात महाविकास आघाडीतील शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून घेरले गेलेत असं रामदास आठवले म्हणालेत. अशात येत्या काळात उद्धव ठाकरे हे महायुतीत परत येतील, असं सूचक विधान रामदास आठवले यांनी केलंय. मध्यप्रदेशातील पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल असं देखील रिपब्लिकन नेते आठवले म्हणालेत.      

सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार प्रचंड काळजीत आहे. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील काळजीत आहेत, सरकारमध्ये निर्णय घेताना उद्धव ठाकरेंना प्रचंड अडचणी येत आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरे महायुतीत परत येतील, असं देखील रामदास आठवले म्हणालेत. यापुढे बोलताना त्यांनी आणखीन एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केलंय. रामदास आठवले म्हणालेत,  "उद्धव ठाकरे परत आले नाहीत तरीही त्यांचे आमदार आमच्याकडे येतील आणि भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आमचं सरकार येईल" असं आठवले म्हणालेत.  

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मोठा राजकीय भूकंप आलाय. या पार्श्वभूमीवर राजकीय भाष्य करताना रामदास आठवेल यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती बदलणार असल्याचं सूचक विधान केलंय. मध्यप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि राजस्थानातही सत्ताबदल होईल असं देखील आठवले म्हणालेत. 

big statement of rpi leader ramadas athawale on maharashtra cm uddhav thackeray

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.