या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police) नोंद करण्यात आली आहे.
डोंबिवली : द्वारली रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली असून हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक झाला आहे. गुरुवारी रात्री एक दुचाकीस्वार या रस्त्याने जात असताना त्याचा तोल जाऊन डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने (Road Accident) त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कल्याण मलंग रोड द्वारली (Kalyan Malang Road) परिसरात रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यारील खड्डे चुकवत असताना या दुचाकीस्वाराचा तोल गेला, खड्ड्यामुळं हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. सूरज गवारी असे मयत इस्माचे नाव असून कल्याण पूर्व चिंचपाडा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police) नोंद करण्यात आली आहे. कल्याण मलंग रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना अनेकदा या रोडवर अपघात होत असतात. हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली जातेय, मात्र महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक दुचाकीस्वार या रस्त्याने जात होता. या दुचाकीस्वाराचा तोल गेला व तो थेट शेजारून जात असलेल्या डंपरच्या मागच्या चाका खाली आला. या अपघातात या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. खड्डे चुकवत असताना त्याचा तोल जाऊन तो डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील चेतन पाटील यांनी केलाय.
मयत दुचाकी स्वराचे नाव सूरज गवारी असे असून तो कल्याण पूर्व रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीमध्ये अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडलेत. रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जातेय. महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला जातोय.
खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली होती. खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठले असताना देखील खड्डे बुजवण्याचं काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येतेय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.