ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर (shahapur) तालुक्यातील वेहळोली येथील एका फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची (Bird flu) लागण झाली असून आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगवल्या (More than 300 hen died) असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या घटनेची गांभीर्याने दाखल घेत, पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
शहापूर तालुक्यातील वेहळोली (वासिंद) येथे मुक्तजीवन सोसायटी आहे. या सोसायटीच्या शेडमधील देशी कोंबड्या व बदके अचानक मृत पावत होते. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कळविले. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र उपचारांनंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांचे शवविच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याबाबतच्या अहवालामध्ये बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न आले. याची गांभीर्याने दाखल घेत, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह ७० जणांच्या पथकाने वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीमध्ये धाव घेतली.
दरम्यान, बाधित क्षेत्रापासून एक किमीच्या परिघात असलेल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या. तसेच त्यांचे खाद्य व अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली असून बधित क्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते, वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याबाबतही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
वेहळोली येथे कोंबड्या मृत्यू पडल्या होत्या. त्या कोंबड्यांचे रक्ताचे नमुने पुणे येथील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात ते बर्ड फ्लू असल्याचे समोर आले. त्यानंतर एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या आणि बदके यांचे कलिंग करण्याचे आदेश दिले. त्या परिसराव्यतिरिक्त इतर कुठेही अशी बाब निदर्शनास आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्व परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.