Bird Flue in Mumbai |मृत कावळ्यांना लागण; कच्चे मांस आणि कच्ची अंडी न खाण्याचे आवाहन

Bird Flue in Mumbai |मृत कावळ्यांना लागण; कच्चे मांस आणि कच्ची अंडी न खाण्याचे आवाहन
Updated on


मुंबई  : मुंबईत मृत झालेल्या कावळ्यांनाही "बर्ड फ्लू'ची लागण झाल्याचे चाचणीत उघड झाले आहे. त्यामुळे महापालिका अलर्ट झाली आहे. नागरिकांनी कच्चे मांस आणि कच्ची अंडी खाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. चिकन विक्रेत्यांनीही मास्क लावून व स्वच्छता राखून काम करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. 

मुंबईत काही ठिकाणी मृतावस्थेत कावळे आढळले होते. त्यांचे नमुने राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. त्यात दोन कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यांना "बर्ड फ्लू'ची बाधा झाल्याचे आढळले. त्यावर महापालिका अलर्ट झाली आहे. पालिकेच्या बाजार विभागामार्फत सर्व चिकन शॉपना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यात दुकानात मास्क वापरणे बंधनकारक आहे.

मांसाची हाताळणी करताना विशेष काळजी घेणे आणि स्वच्छता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कच्चे मांस आणि कच्ची अंडी खाऊ नये, अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. 2005-06 मध्ये महाराष्ट्रात "बर्ड फ्लू' आला होता. त्याचा थेट परिणाम पोल्ट्री उद्योगावर झाला होता. त्या काळात चिकनचे भाव किलोमागे 20 ते 25 रुपयांपर्यंत आला होता. मुंबईत चेंबूर येथील टाटा कॉलनी परिसरात काही कावळे मृतावस्थेत सापडले होते, तर गिरगाव चौपाटी येथील बालोद्यानामध्येही गेल्या काही दिवसांत 12 कावळे मृतावस्थेत सापडले आहेत.

 
Bird flu infects dead crows in Mumbai too

------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.