उरण : घनदाट झाडी, पाणवठे, अल्हादायक वातावरण यामुळे एकेकाळी पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्या हे नानाविविध पशू - पक्ष्यांसाठी नंदनवन होते. परंतु सहली, पक्षी निरिक्षण आदी कारणांमुळे या भागात मानवी वावर वाढल्याने त्याला आता दृष्ट झागली होती. त्यामुळेच पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला होता. तर पशूंचे दर्शनही दुर्लक्ष झाले होते. लॉकडाऊन, संचारबंदीमुळे आता हे चित्र बदलले आहे. मानवी हस्तक्षेप जवळपास शुन्य झाल्याने हे जीव या अभयारण्यात पुन्हा मोकळा श्वास घेउ लागले आहेत. पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट कमालीचा वाढला आहे. त्याशिवाय अभयारण्यात क्वचितच पाहायला मिळणारे कावळे आणि माकडांनी त्यांचा मोर्चा अभयारण्याकडे वळविला आहे, अशा नोंदी वन अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
हे वाचा : सोन्याचे भाव चढेच
कर्नाळा अभयारण्यात शेकडो जातींची आकर्षक आणि स्थलांतरित फुलपाखरे पक्ष्यांची आणि बिबटे, हरिण, भेकर, रानडुक्कर, कोल्हे, ससे, वानर, माकड आदी प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे येते मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, लॉकडाउनमुळे देशभरातील प्राणी संग्रहालये, अभयारण्ये पर्यटकांसाठी 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मुंबईपासून जवळच असलेले कर्नाळा अभयारण्यात त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या परिसरातील वातावरण, आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे परिसरात कधी नव्हे ती निरव शांतता पसरली आहे. यामध्ये विविध पक्ष्यांची मंजुळ आवाज ऐकू येऊ लागला आहे. अभयारण्य बंद करण्याआधी मोठ्या प्रमाणावर माकडे महामार्गावरील विविध रस्त्यांवरच ठाण मांडून बसत होती. या मार्गावरून ये- जा करणाऱ्या प्रवाशांकडून मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे ती अभयारण्याकडे फिरकत नव्हती. अशीच स्थीती कावळ्यांची होती. आता त्यांनी अन्नासाठी अभयारण्याकडे मोर्चा वळविला आहे. कर्नाळा अभयारण्य विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रदी चव्हाण यांनी अशी नोंद केली आहे.
.................
भेकर, बिबट्याचे दर्शन
कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांना बंदी घालण्याआधी प्राण्यांचे दर्शन दुर्लभ होते. आता बिबटे, हरिण, भेकर, रानडुक्कर, कोल्हे, ससे आदी प्राणी पाणवठ्याकडे येत आहेत. संचारबंदीनमर अभयारण्य परिसरात आदिवासी वाड्यातील रहिवाशांची समिती स्तापन केली आहे. त्यामुळे आगीची एकही घटना घडली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.