वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सखोल तपास केला असता, कार्तिकचा खून करण्यात आल्याचे उघड झाले.
उल्हासनगर : वाढदिवस असल्याने दारूची झिंग चढलेल्या आणि पुन्हा दारूची मागणी करताना मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली फोडणाऱ्या बर्थडे बॉय (Birthday Boy) मित्राचा तीन मित्रांनी मिळून चौथ्या मजल्याच्या खिडकीतून फेकून खून केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या (Vitthalwadi Police Station) हद्दीत घडलीये.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या टीमने या घटनेचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत केला आणि त्रिकूट मित्रांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चिंचपाडा (Chinchpada) परिसरात राहणाऱ्या कार्तिक वायाळ याचा 27 जून रोजी वाढदिवस होता. दुसऱ्या ठिकाणी केकचे सेलिब्रेशन झाल्यावर आर्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नीलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे पर्यंत पार्टी सुरू राहिली. दारूची झिंग चढलेल्या कार्तिकने पुन्हा दारूची मागणी केली, त्यावर आपण खूप एन्जॉय केलाय, आता दारू नको असे कार्तिकला समजावले. पण, राग आलेल्या बर्थडे बॉय कार्तिकने नीलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नीलेश क्षीरसागर, सागर काळे, धीरज यादव या तिघांनी कार्तिकला जबर मारहाण केली आणि चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकून दिले. त्यात कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सखोल तपास केला असता, कार्तिकचा खून करण्यात आल्याचे उघड झाले. कार्तिकचे वडील नामदेव वायाळ यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार सोमवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिकूट मित्रांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टी. एन. खळडे हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.