आशिष शेलार यांनी बॉलिवूड चित्रपटातील डायलॉग मारत दिलं आव्हान
मुंबई: महापालिकेच्या (Mumbai BMC) निवडणुका २०२२मध्ये प्रस्तावित आहेत. पण सध्याच्या काळातील कोरोना प्रादुर्भावाचे (Coronavirus Outbreak) कारण देत निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा डाव शिवसेनेकडून (Shivsena) रचला जात आहे. सामनातून हल्ली अनेक डायलॉग्स (Bollywood Dialogue) लिहिले जातात. त्याच स्टाईलमध्ये (Style) मी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल शिवसेनेला डायलॉगच्या माध्यमातून सांगतो, 'बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन तारीख भी तेरी, सुबह कहें सुबह, शाम कहें शाम.... इस चुनाव (Elections) में भारतीय जनता पार्टी शिवसेना को परास्त करने के लिए तैयार है', असा हिंदी चित्रपटातील (Hindi Films) लोकप्रिय डायलॉग मारत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला खुलं चॅलेंज दिलं. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (BJP Ashish Shelar gives Open Challenge to Shivsena in Mumbai BMC Elections with Bollywood Dialogue)
"दोन वर्षे निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव शिवसेना रचत आहे. कोरोनाचं कारण नक्कीच गंभीर आहे. त्यामुळे अशा वेळी जर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, तर त्या वाढीव कार्यकाळातील कोणतेही ठेकेदारांचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर न आणता थेट निवडणूक आयोगापुढे मांडावे लागतील. निवडणूक आयोगाआडून जर शिवसेनेने भ्रष्टाचाराचा प्रयत्न केलाच तर आम्ही त्यांचे पितळ उघडे पाडू", असा इशारा शेलार यांनी दिला.
"७० कोटी खर्चून मुंबई महापालिकेने केलेली नालेसफाई संपूर्णपणे आभासी आहे. पाच लाख मेट्रीक टन कचरा या नालेसफाईतून काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मग हा कचरा कोणत्या डंपिंग ग्राऊंडला टाकलाय तेदेखील स्पष्ट करण्यात आलं पाहिजे. २० हजार कोटींचे सांडपाण्याचेही एक टेंडर निघणार आहे. त्यातील कट-कमिशन कदाचित मिळायचं राहिलं आहे आणि म्हणूनच दोन वर्षे निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव शिवसेना खेळत आहे. पण मुंबईकरांच्या आवश्यक सुविधांसाठी भाजपचा लढा चालूच राहिल", असं शेलार यांनी स्पष्ट केलं.
OBC आरक्षण मुद्द्यावर...
"राज्य सरकारने कोर्टात खंबीर बाजू मांडली नाही. फडणवीस सरकारने आरक्षण टिकवलं आणि तुम्ही घालवलंत. OBC नी अतिरिक्त निवडणुकीत आरक्षण मिळवलं होत. ते हे सरकार टिकवू शकलं नाही. OBC आरक्षणाचा खून महाराष्ट्र सरकारने केला. अशा वेळी विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ हे सत्तेत मग्न कसे राहू शकतात?", असा सवाल त्यांनी केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.