"सामना म्हणजे क्षणभराचं साहित्य अन् अनंतकाळची रद्दी"

भाजप आमदाराची खोचक टीका
Sanjay Raut
Sanjay Raut
Updated on

भाजप आमदाराची खोचक टीका

मुंबई: बोरूबहाद्दर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अग्रलेखाला (Editorial) एवढी किंमत द्यायचं काहीही कारण नाही. त्यांना कदाचित गुदगुल्या झाल्या असतील की ओबीसींनी आरक्षण (OBC Reservation) न देण्याचा त्यांच्या सरकारचा (Uddhav Thackeray Govt) जो डाव आहे, तो यशस्वी होईल आणि फडणवीस (Devendra Fadnavis) राजकीय संन्यास घेतील. त्या आनंदाच्या भरात त्यांनी एक अग्रलेख लिहिलाय असं मला वाटतं. आचार्य अत्रे यांच्या शब्दात बोलायचं झालं तर सामना (Saamana) म्हणजे क्षणभराचं साहित्य आणि अनंतकाळची रद्दी आहे. त्या पलिकडे 'सामना'ला काडीचंही महत्त्व नाही, अशा शब्दांत भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी सामनावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीसांबद्दल 'सामना'च्या अग्रलेखात जे लिहिण्यात आलं होतं, त्यावर भातखळकर यांनी उत्तर दिलं. (BJP Atul Bhatkhalkar slams Sanjay Raut and Saamana Editorial over Devendra Fadnavis issue)

Sanjay Raut
आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, कारण... - संजय राऊत

राज्य सरकारमधील मंत्रीच ओबीसी आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली असती, तर ओबीसी आरक्षण कायम राहिलं असतं. आमच्या हातात सूत्र द्या. ओबीसी आरक्षण परत आणलं नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर, 'सामना'तून फडणवीसांना उत्तर देण्यात आलं होतं.

Sanjay Raut
आता लोकल प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास!
अतुल भातखळकर
अतुल भातखळकर

"संजय राऊत यांना मला सांगायचं आहे की राज्य तुमचं असलं तरीही आम्ही OBC ना आरक्षण नक्की मिळवून देऊ. राज्यातील विविध समाजात फाटाफूट लावून देण्याचा तुमचा कितीही हेतू असला तरी भाजपा तसं होऊ देणार नाही. संजय राऊत यांनी लिहित राहावं, तोच त्यांचा धंदा आहे. त्यावरच त्यांची रोजी-रोटी सुरू आहे. संजय राऊतांच्या मताला महाराष्ट्रात कोणीही फारशी किंमत द्यायचं काही कारण नाही", असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

Sanjay Raut
पोलिस दलातील दलदल

"केवळ भाजपचेच लोक नव्हे तर खुद्द शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरेदेखील सामना पेपर आजकाल वाचत नाहीत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्याचा व्हिडीओदेखील सोशल मिडियावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.