मुंबईत भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिल्या बैठकीस सुरुवात

मुंबईत भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिल्या बैठकीस सुरुवात
Updated on

मुंबईः  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची आज बैठक होतेय. जे. पी. नड्डा दिल्लीतून बैठकीत सहभागी होणार असून मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहतील. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीनंतर जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची पहिल्यांदाच बैठक होत आहे. भाजपाच्या मुंबईतील दादर येथील वसंतस्मृती या कार्यालयात सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम होणारेय. 

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वसंतस्मृती कार्यालयातून संबोधित करतील. तसंच मुंबई परिसरातील भाजपाचे पदाधिकारी दादर येथील वसंतस्मृती येथे उपस्थित राहणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, राज्यातील अन्य भाजप खासदार, आमदार यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी आपापल्या ठिकाणाहून सहभागी  होणारेत.

भाजपची राज्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बैठक होणारेय. देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, उद्धव ठाकरेंनी सरकार पाडून दाखवण्याबाबत दिलेले भाजपला आव्हान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेली टीका आणि राज्यातील कोरोनाची स्थिती या पार्श्वभूमीवर बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकारिणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. 

या बैठकीत राज्य सरकारला कोरोनाचा मुकाबला करण्यात आलेलं अपयश, दुधाचा प्रश्न, साखरेचा प्रश्न, निसर्ग वादळग्रस्तांना न मिळालेली सरकारी मदत यावर सरकारवर टीका करणारा राजकीय प्रस्ताव मंजूर केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय 5 ऑगस्टला होणाऱ्या राममंदिर भूमीपूजनाबद्दलही प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

BJP chief to address first video conferencing meet Maha executive committee

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.