मुंबई : धारावीच्या पुनर्विकास योजनेत जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा झाला असल्याचा आरोप ठाकरेंनी केला होता. याला उत्तर देताना एकदा 'ठाकरे डिमांड रुपया' (TDR) मिळाला की 'यूटर्न' घेण्याचा मार्ग मोकळा, अशा शब्दांत भाजपनं उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. (BJP critisized on Uddhav Thackeray speech at Dharavi Bachav Morcha says Thackeray Demand Rupee means TDR)
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे नेहमीच विकासाच्या विरोधात काम करतात. प्रकल्प अडवून कटकमिशन वसूली करणारे मुंबईकरांसाठी नाही तर कटकमिशनसाठी संघर्ष करत आहेत. यांच्या सरकारच्या काळातच धारावीच्या पुनर्विकासाचं टेंडर निघालं. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरे (UT) म्हणजे यूटर्न आहे. आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यातून प्रत्येकवेळी यूटर्न घेतले आहेत. आता त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करणारी भूमिका घेतली आहे. 'यूटर्न फेम' उद्धव ठाकरेंनी आज मोर्चा काढला तोही 'टी जंक्शन' वरूनच. म्हणजे कुठल्याही बाजूला वळायची सोय आहेच. (Marathi Tajya Batmya)
एकदा 'ठाकरे डिमांड रुपया' (TDR) त्यांना मिळाला की 'यूटर्न' घेण्याचा मार्ग मोकळा. आज ते म्हणाले त्यांनी घेतलेला बिल्डर धार्जिणा एकतरी निर्णय दाखवा. या विधानावरुनच त्यांनी यूटर्न घेतला आहे, असा दावाही यावेळी आशिष शेलार यांनी केला. (Latest Maharashtra News)
कोविडमध्ये बिल्डरांना 12 हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला? असा सवाल करत शेलारांनी मुंबईकरांना उद्देशून म्हटलं की, धारावीकरांचा यांना पुळका जोरात, खोके घेऊन अदानी कधी जाणार आता मातोश्रीच्या दारात? असा सवालही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.