आदित्य ठाकरेंच्या नावाचा आधार घेत भाजपची भन्नाट ऑफर

वाचा नक्की काय आहे ऑफर...
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आधार घेत भाजपची भन्नाट ऑफर
Updated on

मुंबई: उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उपनगरात आले तर दाखवा अन तरुणांनी कोरोना लसीकरण (Free Vaccination) मोफत मिळवा, अशी अनोखी योजना (Offer) भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जाहीर केली. आदित्य ठाकरे हे गेली दीड वर्षे अनेक नैसर्गिक संकटे (Natural Calamity) येऊनही उपनगरांमध्ये फिरकले नसल्यामुळे भातखळकर यांनी ही योजना जाहीर केली आहे. कोरोनासारखी जीवघेणी साथ, निसर्ग-तौक्ते अशी दोन चक्रीवादळे, अनेक वेळा झालेली अतिवृष्टी या प्रकारे वारंवार नागरिकांचे हाल होत असतानाही मुंबई (Mumbai) उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे दीड वर्षे उपनगरात फिरकलेच नाहीत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांना उपनगरांत दाखवल्यास तरुणांना (18 ते 44 वय) मोफत लसीकरण दिले जाईल, अशी योजना जाहीर केल्याचे भातखळकर म्हणाले. (BJP gives Funny Offer in the name of Aaditya Thackeray of Free Vaccination to 18 to 44 age group)

आदित्य ठाकरेंच्या नावाचा आधार घेत भाजपची भन्नाट ऑफर
भयानक! कोविड लसी समजून चोरले पोलिओचे डोस

"आदित्य ठाकरे यांची मुंबई उपनगराचे पालकमंत्री म्हणून नेमणूक होऊन दीड वर्षे उलटून गेली. या काळात केवळ एक वेळा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर कोणतीही कार्यवाही पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेली नाही. मागील वर्षी मे महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि परवा आलेले तौक्ते चक्रीवादळ यामुळे वर्सोवा, मढ, मार्वे बोरीवली या परिसरातील मच्छीमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. मालाड मध्ये झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये, इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरगुती साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, झाडे पडल्यामुळे 48 तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. भारतीय जनता पक्षाने वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही", असे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.

आदित्य ठाकरेंच्या नावाचा आधार घेत भाजपची भन्नाट ऑफर
"मरण डोळ्यापुढे दिसलं..."; अधिकाऱ्याचा सांगितला भयानक अनुभव

"मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे लोकांना वाऱ्यावर सोडून, घरात बसून एसीची हवा खाण्यात मग्न आहेत. उपनगरवासियांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांना अनेकदा बोलावण्यात आले होते, पण ते एकदाही आले नाहीत. लपूनछपून ताडोबा पर्यटन करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबईतील नागरिक अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडफडून, होरपळून मृत्युमुखी पडत असताना मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर व रुग्णालयांना भेटी दिल्या नाहीत. कोरोनातून ते स्वतः बरे झाले असल्याने त्यांना आता जनहितासाठी दौरे करायला हरकत नाही. त्यांच्या वरळी मतदारसंघातही ते फारसे दिसले नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मागील दीड वर्षाच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे", असा प्रश्नही भातखळकर यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.