मुंबई महापालिका प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी 236 पहारेकरी - आशिष शेलार

ashish shelar
ashish shelar sakal media
Updated on

मुंबई : महापालिकेची (bmc) मुदत संपल्यामुळे मुंबईचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल (dr iqbal singh chahal) यांच्याकडे गेला आहे; मात्र गेल्या पाच वर्षांतील भाजपची पहारेकऱ्यांची भूमिका यापुढेही कायम राहणार आहे. पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आता आमच्याकडे २३६ पहारेकरी (watchman) आहेत, असे सांगत भाजप नेते ॲड. आशीष शेलार (ashish shelar) यांनी आगामी महापालिका निवडणूक भाजप स्वतंत्र लढणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

ashish shelar
मनोर : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई; दोघांना अटक

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना शेलार यांनी पाच वर्षांत नगरसेवकांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. २५ वर्षे आम्ही शिवसेनेबरोबर सत्तेत होतो; मात्र तेव्हाही भाजपचे नगरसेवक पहारेकऱ्याच्याच भूमिकेत होते. या काळात अनेक घोटाळे भाजपच्या नगरसेवकांनी उकरून काढल्याचे शेलार म्हणाले. गेल्या पाच वर्षांत पालिकेतील भ्रष्टाचार आम्ही उघड केले आहेत. हजारो कोटी रुपयांचे घोटाळे आहेत. त्याचा हिशेब मतदार निवडणुकीवेळी शिवसेनेकडून वसूल करतील, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी आमदार राजहंस सिंह, योगेश सागर, नीतेश राणे, पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.

भाजप मिशन ‘१३४ प्लस’

मुंबई महापालिकेला यंदा १३४ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने १३४ हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय ठेवल्याचेही शेलार यांनी जाहीर केले.

प्रभागरचना सदोष

महापालिका निवडणुकीची प्रभागरचना खासगी कंपनीमार्फत करण्यात आली आहे. प्रभागरचनेचे कोणतेही निकष पाळण्यात आलेले नाहीत. पुरावाच हवा असेल तर त्या काळात आयुक्तांच्या दालनाच्या मजल्यावरील सीसी टीव्ही तपासले तरी कोण कोण व्यक्ती फिरत होत्या ते समजून येईल. शिवसेनेच्या ५३ विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांच्या रचनेत बदल झाला नाही; मात्र भाजपच्या ५२ नगरसेवकांचे प्रभाग फोडण्यात आले, असाही आरोप शेलार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.