"तीन पक्षाच्या सरकारमध्ये भाजप 'मोठा भाऊ', पण..."; फडणवीसांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फडणवीसांनी राज्यातील स्थितीवर भाष्य केलं.
ajit pawar devendra fadnavis eknath shinde
ajit pawar devendra fadnavis eknath shinde
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात तीन पक्षांचं आपलं सरकार आहे. आपल्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या सरकारमधील मोठा घटक पक्ष आपण आहोत. पण ही गोष्ट लक्षात ठेवा हे सरकार तीन पक्षांचं सरकार असलं तरी भाजप आपल्या ध्येय धोरणांवरुन तसूभरही बाजुला होणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे. (BJP is big brother in Maharashtra three party govt Devendra Fadnavis says in BJP workers meeting)

ajit pawar devendra fadnavis eknath shinde
IIT Mumbai: 'आयआयटी मुंबई'चा वादग्रस्त निर्णय; 'ओन्ली व्हेज'ला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्याला लावला 10,000 रुपयांचा दंड

त्याग करावा लागतो

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात आपलं तीन पक्षांचं सरकार आहे. आपल्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत आहे. या सरकारमधील मोठा घटक पक्ष आपण आहोत, भाजप हा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणं कधी त्यागही करावा लागतो. (Latest Marathi News)

ajit pawar devendra fadnavis eknath shinde
हासन अली अन् विराटची खुन्नस! पण बायको 'फॅनगर्ल'

भाजप आपल्या ध्येयापासून बाजुला होणार नाही

मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणं दोन्ही भावांना सांभाळूनही घ्यावं लागतं. त्यामुळं ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा हे सरकार तीन पक्षांचं सरकार असलं तरी भाजप आपल्या ध्येय धोरणांवरुन तसूभरही बाजुला होणार नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

ajit pawar devendra fadnavis eknath shinde
Supriya Sule: सुप्रिया सुळे विदर्भातील 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक; म्हणाल्या...

यंदा रेकॉर्ड मोडू

आपलं जे धोरण आणि धेय आहे त्यानुसारच भाजप काम करत राहिलं, पण आपल्या दोन्ही मित्र पक्षांना सोबत घेऊन. मी तुम्हाला निश्चित सांगतो आपण गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये ४० च्या वर जागा मिळवल्या आहेत. यावेळी देखील जर तुम्ही योग्य मेहनत केली तर आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आपण मोडू शकतो, असं वातावरण सध्या या ठिकाणी आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.