भाजपची जन आशीर्वाद नसून 'जन अपमान यात्रा'- राष्ट्रवादीची टीका

Narayan-Rane-Ashirwad
Narayan-Rane-Ashirwad
Updated on

"जन आशीर्वाद यात्रा काढून तिसर्‍या लाटेला भाजपा देतंय आमंत्रण"

अलिबाग: कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जन आशीर्वाद यात्रा म्हणजे 'जन अपमान यात्रा' आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपने शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. या यात्रेची पोलखोल करण्याची मोहीम राष्ट्रवादीने हाती घेतली आहे. त्यासाठी २१ ऑगस्टपासून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे. आज जनआशिर्वाद यात्रा रायगडमध्ये असून राष्ट्रवादीनेही तेथेच पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर टीका केली.

Narayan-Rane-Ashirwad
मुंबई : गणेश विसर्जनासाठी नियमावली जाहीर; जाणून घ्या...

"मोदींचे सरकार आल्यावर लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. आता जनआशिर्वाद यात्रा काढण्यात येते आहे. लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांचा अपमान करण्याचे काम हे भाजपवाले करत आहे. कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने झाली. त्यानंतर बंगालच्या निवडणूकीवेळी दुसरी लाट आली आणि आता जन आशीर्वाद यात्रा काढून तिसर्‍या लाटेला भाजप आमंत्रण देत आहे. जे काम केलेच नाही ते सांगायचं आणि राजकारणाची भाकरी भाजायची ही पध्दत भाजपा वापरत आहे", असा आरोप तपासे यांनी केला.

Narayan-Rane-Ashirwad
ऑटो रिक्षा चोरी करणाऱया सराईत गुन्हेगाराला अटक
Mahesh-Tapase-NCP
Mahesh-Tapase-NCP

"पेट्रोल- डिझेलचे दर वाढतच आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर गॅस सिलेंडरने हजारी गाठली आहे. युपीएचे सरकार असताना एक रुपयांची जरी वाढ झाली तरी ओरड करणारे आज कुठे आहेत? आज इंधन घेण्यासाठी लोकांकडे पैसा नाही. मात्र भाजपा सरकार हेच पैसे जमा करून स्वतःच्या योजनांवर खर्च करत आहे. दोन कोटी रोजगार देणार होते. दोन कोटी रोजगारांचं काय झालं?", असा संतप्त सवाल महेश तपासे यांनी केंद्र सरकारला केला.

Narayan-Rane-Ashirwad
मुंबई : घरावर पालिका कारवाई करणार या धास्तीने महिलेचा मृत्यू

"जन आशीर्वाद यात्रेत पेट्रोल-डिझेलची दरवाढ यावर भाजपावाले काही बोलताना दिसत नाहीत. पेगॅसससारख्या माध्यमातून हेरगिरी करण्याचं कटकारस्थान झालं. गृहमंत्र्यांनी यावर संसदेत भाष्य केले नाही. विरोधी पक्षांनी याविरोधात सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणले. याविरोधात पेगॅससप्रकरणी एडिटर गिल्डने याचिका दाखल केली. मात्र मोदी सरकारने यावर काहीच भाष्य केले नाही. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर भारताचा ध्वज ठेवल्यानंतर भाजपाचा ध्वज ठेवण्यात आला हा देशाचा अपमान आहे. एवढी मोठी घटना घडते याचा अर्थ यांना राज्यघटना मान्य नाही. याप्रकरणी भाजपने व पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी", अशी मागणी त्यांनी केली.

Narayan-Rane-Ashirwad
साक्षी ज्वेलर्स दरोडा आणि हत्याकांडाचा 48 तासात उलगडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.