वरळी-कलानगर सोडून मुंबईच अस्तित्व शिवसेनेला मान्य आहे? - भाजपा

“वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा झोल, हे धंदे शिवसेनेचे आहेत" अशी बोचरी टीका आशिष शेलारांनी केली आहे.
Ashish shelar
Ashish shelarsakal
Updated on

मुंबई: मुंबईत फक्त 927 खड्डे (potholes) असल्याचे मुंबई महापालिकेचे (BMC) म्हणणे आहे. त्यावरुन भाजपाचे आमदार आणि नेते आशिष शेलार (Ashish shelar) यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. “वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा झोल, हे धंदे शिवसेनेचे आहेत" अशी बोचरी टीका आशिष शेलारांनी केली आहे.

"संपूर्ण मुंबईच क्षेत्रफळ मुंबईच्या महापौरांच्या डोळ्यासमोर असतं का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी पाहतात का? नवीन फुटपाथला रेलिंग द्यायची तर ती वरळी. ट्रॅफीकचे अद्यावत दीवे द्यायचे असतील तर वरळी. संपूर्ण मुंबईत मोठे ब्रिज आहेत. ब्रिजखाली सुशोभिकरण करायचं असेल तर वरळी. सगळंच वरळीमध्ये सुरु होतं" त्याच मुद्यावरुन आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Ashish shelar
गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सोडलं रेल्वे रुळावर

"लहान मुलांसाठी कोविडसाठी आयसीयू सेंटर बनवायचं असेल तर वरळीत बनणार. त्या पलीकडे पाणी तुंबत म्हणून पाण्याचा निचरा करायचा असेल तर वरळी ते कलानगर सिग्नल. कलनागर सिग्नलला एकनाही असंख्य पंप. वरळी आणि कलानगर सोडून मुंबईच अस्तित्व शिवसेनेला, महापौरांना मान्य आहे का? खडड्डयांच्या बाबतीत बनवाबनवी, थ्री डी मॅपिंगच्या बाबतीतही अशीच बनवाबनवी आहे, लवकरच हे सर्व उघड करु" असे आशिष शेलार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.