भारताने लसी विदेशात का पाठवल्या? राम कदमांनी सांगितलं कारण...

मुंबईच्या रस्त्यावर काँग्रेसची नौटंकी सुरु आहे.
BJP-MLA-Ram-Kadam
BJP-MLA-Ram-Kadam
Updated on

मुंबई: "लसीकरणावरुन मुंबईच्या रस्त्यावर काँग्रेसची नौटंकी सुरु आहे. त्यांना व्यवस्थित ठाऊक आहे, जेव्हा लसी बनवण्यासाठी (vaccintation) आपण विदेशातून कच्चा माल (raw material) आयात करतो, तेव्हा कराराप्रमाणे काही लसी निर्यात कराव्या लागतात. ते बंधनकारक आहे" अशा शब्दात भाजपा आमदार राम कदम (ram kadam) यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनावर टीका केली. (Bjp leader ram kadam slam congress over there protest on mumbai roads over vaccination issue)

"काँग्रेस नेत्यांचा अभ्यास नसेल किंवा असेल, तरी लोकांना त्यांना भ्रमात टाकायचं आहे. म्हणून काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची रस्त्यावर नौटंकी सुरु आहे. लसी विदेशात का पाठवल्या म्हणून आंदोलन करतात. लसी बनवण्यासाठी परदेशातला कच्चा माल पाहिजे, तर काही लसी परदेशात पाठवाव्या लागणार एवढं साध-सोप गणित काँग्रेसच्या नेत्यांना माहित आहे. केवळ वसुलीमध्ये बदनाम झालेलं काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करतय" अशी टीका राम कदम यांनी केली.

BJP-MLA-Ram-Kadam
कोरोनाला रोखणारं कॉकटेल मुंबईत उपलब्ध, किंमत ६० हजार रुपये

भाई जगताप काय म्हणाले?

"जगात सर्वाधिक लसी भारतात (india vaccination) तयार होतात. पण भारतातल्या जनतेला त्याचा फायदा नसेल तर काय उपयोग?" असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी विचारला आहे. "विरोधी पक्षनेते इतर वेळेस थयथयाट करतात. आता भाजपाचे अनेक लोक सोसायटी मध्ये जाऊन पेड व्हॅक्सिनेशन करत आहेत" अशी टीका भाई जगताप (bhai jagtap) यांनी केली.

BJP-MLA-Ram-Kadam
नात्याला कलंक, पुतण्यानेच काकीवर केला बलात्कार

लोकांच्या जीवाशी खेळू नका, असं त्यांनी म्हटलं आहे. "आतापर्यंत एवढ्या लसी आल्या पण असं राजकारण झालं नाही. कधीच कुठल्या लसी संदर्भात असा व्यापार झाला नाही. 2024 पर्यंत हे लसीकरण तुम्हाला चालू ठेवायचे का?" असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()