मुंबई (Mumbai) : भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप होत असताना त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. हितेंद्र ठाकूर यांच्यासह त्यांनी पत्रकार परिषदेतही सहभाग घेतला..Vinod Tawde : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत' राऊतांचा इशारा कोणाकडे?.विरारमधील विवांत हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये वाटताना विनोद तावडे यांना पकडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना भाजप नेत्यानेच याबाबत माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आल्याचे स्वतः ठाकूर यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर विरारमध्ये मोठा राडा झाला आहे. या राड्यानंतर विरोधी पक्षांकडून तावडे आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी अखेर तावडेंनी स्पष्टीकरण दिले आहे..Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?.विनोद तावडे म्हणाले, की माझा चेहरा सर्वांना माहिती आहे. मी निवडणुकीसंदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे आले, त्यांचा असा गैरसमज झाला की, मी पैसे वाटतो आहे. पण याप्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलिस तपास करत आहेत. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजही आहे. मी गेली ४० वर्ष राजकारणात आहे. जे सत्य आहे, ते समोर आहे. माझीसुद्धा मागणी आहे की याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी..भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, "...नालासोपाऱ्याच्या आमदारांची बैठक सुरू होती. मतदानाच्या दिवशी आदर्श आचारसंहिता कशी पाळायची, मतदान यंत्र कसे सील केले जाईल आणि काही आक्षेप मांडायचा असेल तर त्यासाठी काय करावे लागेल, याबद्दल चर्चा सुरू होती. मी त्यांना याबाबत सांगण्यासाठी तिथे गेलो होतो. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना, आप्पा ठाकूर आणि क्षितिज यांना वाटले की आम्ही पैसे वाटत आहोत. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी चौकशी करावी, सीसीटीव्ही फुटेज मिळवावे. मी पक्षात 40 वर्षे आहे. आप्पा ठाकूर आणि क्षितिज मला ओळखतात, पूर्ण पक्ष मला ओळखतो...तरीही, मला वाटते की निवडणूक आयोगाने निष्पक्ष तपास करावा.".सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.