BJP Maharashtra: भाजपच्या पहिल्या यादीत का नाही महाराष्ट्रातील एकाही जागेचं नाव? ही आहेत महत्वाची कारणं

महाराष्ट्रात भाजपचे २ मित्रपक्ष आहेत यामुळे इकडे जागावाटप करणं भाजपसाठी कठीण कार्य आहे | Since BJP has 2 allies in Maharashtra, it is a difficult task for BJP to distribute seats here
BJP Maharashtra
BJP Maharashtrasakal
Updated on

BJP Maharashtra: भाजपने काल १९५ उमेदवारांची आपली पहिली जम्बो यादी जाहीर केली. यात आताचे केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचा ही समावेश आहे.

मात्र यात महाराष्ट्रातील एकही नाव नसल्याने सगळ्यांच्याचं भुवया उंचावल्या. इतकंच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही नाव या यादीत नाही. अशावेळी यामागची नक्की कारणं काय असतील? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.(why no candidates in maharashtra bjp)

BJP Maharashtra
BJP First List Lok Sabha: प्रज्ञा ठाकूर...हर्ष वर्धन; भाजपने कोणत्या दिग्गजांचं कापलं तिकीट? जाणून घ्या

महाराष्ट्रातील मित्र पक्षांशी जागावाटपाची चर्चा ५ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान होणार आहे. महाराष्ट्रात भाजपचे २ मित्रपक्ष आहेत यामुळे इकडे जागावाटप करणं भाजपसाठी कठीण कार्य आहे.(amit shah in mahrashtra)

दुसरीकडे तर भाजपने किमान ३३ जागा लढाव्यात, अशी सर्वेक्षण संस्थांची सूचना आहे.मात्र शिवसेनेला, राष्ट्रवादीला हे मान्य होईल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.काही अपवाद वगळता शिंदे गटातील खासदार निवडून येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे असल्याचे सर्वक्षणात म्हटले गेले आहे.(mumbai news)

BJP Maharashtra
BJP Lok Sabha Candidates List 2024: अमित शाहांची चाणक्यनिती! पहिल्या यादीत खेळले सेफ 8 नवे डाव, भाजपला कसा होणार फायदा?

मात्र भाजपला अधिकच्या जागा देण्यास शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध आहे. शिंदेच्या नेत्यांचा कितीही विरोध असला तरी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोध करतील असे आता तरी वाटत नाही.(ekanth shinde shivsena)

म्हणूनच अमित शाह यांचा होणारा ५ मार्चचा दौरा हा अतिशय महत्वाचा असून त्यानंतरच भाजप आपले उमेदवार जाहीर करेल असे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे अमित शहा ५ तारखेला महाराष्ट्रात येऊन नक्की काय निर्णय घेतात? मित्र पक्षांना यावेळी किती जागा मिळतात आणि भाजप कोणाला तिकीट देत आणि कोणाचं तिकीट कापतं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.(maharashtra political News)

BJP Maharashtra
BJP Candidate List 2024: मुंबई काँग्रेसच्या माजी अध्यक्षाला भाजपने दिलं युपीमधून तिकीट, पण करावी लागणार कसरत

एकाच जागेचा विशेष उल्लेख का करा?

गडकरी अत्यंत मोकळेपणाने बोलतात ,त्यामुळे त्यांच्या बोलण्याचे विश्लेषक वेगवेगळे अर्थ काढू शकतात. भाजपत अशा मोकळेपणाने बोलणारा अन्य नेता नाही.त्यामुळे गडकरींना संधी मिळणार की नाही इथवर अर्थ काढले जातात.

कदाचित त्यांच्या या बोलण्याच्या सवयीमुळेच, महाराष्ट्राची यादी जाहीर जर व्हायची आहे तर कशाला एकच अपवाद करा? ,एकाच जागेचा विशेष उल्लेख का करा? या भावनेने कालच्या यादीत गडकरींचे नाव भाजप श्रेष्ठींनी घेतले गेले नसावे.

मात्र त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपच्या संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांसाठी महत्वाची ठरणार आहे असे मत जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणाले(nitin gadkari News)

BJP Maharashtra
CAA कायद्याची पुन्हा चर्चा, Amit Shah यांचा काय आहे प्लॅन ? | BJP | Congress

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.