Jayant Patil: कोरोना काळात मृत व्यक्तीच्या नावावर पैसे काढणारा BJP आमदार कोण? जयंत पाटलांनी केला खळबळजनक आरोप

Jayant Patil news in marathi : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून बोगस डॉक्टर दाखवले गेले आहेत. रुग्णालयाने बोगस डॉक्टर दाखवून करारनामा केला आहे.
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत धक्कादायक आरोप केला आहे. भाजपच्या एका आमदाराने कोव्हिड महामारीच्या काळात मेलेल्या व्यक्तींना जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींच्या माध्यमातून पैसे काढल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी केलेले खुलासे-

जयंत पाटील म्हणाले की, कोविडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जीवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. हे प्रकरण खटाव तालुक्यातील मौजे मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमधील आहे. 2020 मध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून स्वतःचा फायदा करून घेतला आहे.

मृत व्यक्तींना दाखवून फसवणूक-

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून बोगस डॉक्टर दाखवले गेले आहेत. रुग्णालयाने बोगस डॉक्टर दाखवून करारनामा केला आहे. डॉ. शशिकांत कुंभार यांनी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नसतानाही त्यांच्या नावाने उपचार दाखवले आहेत. सातारा जिल्हा परिषदेकडे खोटी कागदपत्रे दाखवून 300 बेडचे रुग्णालय नुतनीकरण करून शासनाची फसवणूक केली आहे.

Jayant Patil
Worli Hit And Run Case: मिहीर शहाला कोणी मदत केली? निबंध घेऊन जावा लागणार का? 60 तासानंतर अटक झाल्यामुळे ठाकरेंचा संताप

मृत रुग्णांना जीवंत दाखवून उपचार-

कोव्हीड 19 काळात उपचारादरम्यान 200 ते 250 रूग्णांचा मृत्यु झाला होता. मृत्यू पावलेल्या रुग्णांना जीवंत दाखवून महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार दाखवले आहेत. मृत रुग्णांना डिस्चार्ज देताना ते व्यवस्थित असल्याचे दाखवून खोट्या सह्या केल्या आहेत.

सरकारला जयंत पाटील यांचा टोला-

जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी घोषणा केली होती की त्यांचे सरकार गोरगरिबांसाठी काम करेल. पण हे सरकार मृत व्यक्तींवर उपचार करण्याचे कौशल्य साध्य करत आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कौशल्य विकासासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या समितीवर मृत व्यक्तींवर उपचार करण्याचे कौशल्य असलेल्या तुमच्या सहकाऱ्याला अध्यक्ष म्हणून नेमावे, मग तुमचा कारभार कसा गतीमान होतोय ते पहा.

Jayant Patil
Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी मोठी घडामोड! फरार मिहीर शहाला अखेर अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.