प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणात ऑडिट करण्याचा सरकारचा निर्णय

प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणात ऑडिट करण्याचा सरकारचा निर्णय
Updated on

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप आहेत. सहकार विभागानं मुंबै बँकेचं सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सहकार विभागाने मुंबै बँकेतील विविध शाखांचे सविस्तर लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही भाजपच्या ताब्यात असून प्रवीण दरेकर बँकेचे अध्यक्ष आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाबार्डनं यासंदर्भात अहवाल दिला आहे. त्यानंतर सहकार विभागानं सविस्तर ऑडिट करण्याचं ठरवलं. नाबार्डनं १६ फेब्रुवारीला या प्रकरणाचा अहवाल सुपूर्द केला.

यामध्ये मुंबै बँकेच्या विविध शाखांमध्ये भाडे करार, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि फर्निचर खरेदीच्या व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्रुटी असल्याचं निदर्शनास आल्यामुळे आता या सर्व शाखांचं ऑडिट होणार आहे. 

त्याचबरोबर बँकेने गेल्या पाच वर्षात मालमत्ता दुरुस्ती आणि नुतनीकरणासाठी केलेल्या खर्चाची तपासणी, बँकेने कार्पोरेट लोन पॉलिसी अंतर्गत दिलेल्या आणि वसूल न झालेल्या थकीत कर्ज खात्यांची तपासणी, बँकेने स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थाना दिलेल्या कर्जाची तपासणी केली जाईल. 

आपल्या कार्यक्षेत्राबाहेर बँकेने दिलेल्या आणि वसूल न झालेल्या कर्जाची तपासणी, 
मागील पाच वर्षातील अनुत्पादित वर्गवारीतील तसेच गैरव्यवहारातील सोने तारण कर्ज खात्याची तपासणी तसंच गेल्या  ५ वर्षात मजूर संस्थांना दिलेल्या आणि वसूल न झालेल्या कर्जाची तपासणी, बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या कर्ज खात्यांची तपासणी,  सभासद सहकारी संस्थांना दिलेल्या कर्ज खात्यांची तपासणी याचंही ऑडिट होणार आहे.

Bjp mla pravin darekar audit Mumbai bank ordered by Mahavikas Aghadi government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.