Mumbai News : भाजपाचा मुंबईत रामलीला कार्यक्रमांचा धडाका

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुबईत रामलीली कार्यक्रमांचा धडाका लावण्याची शक्यता आहे.
bjp party
bjp partysakal
Updated on

मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुबईत रामलीली कार्यक्रमांचा धडाका लावण्याची शक्यता आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या रामलीला कार्यक्रमासाठी मैदानासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, अग्निशमन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाला याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने निर्णय घेतला असल्याचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रामलीला उत्सवात भाजप मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मुंबईत दरवर्षी नवरात्रौत्सवात मुंबईत विविध ठिकाणी रामलीला कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच या कार्यक्रमा विषयी पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. दरवर्षी गणेशोत्सव मंडळांची पालिका प्रशासनाबरोबर बैठक होते आणि मंडळांच्या अडचणी, परवानग्यांचे प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे आता रामलीला मंडळांच्या समस्या पालिका सोडवणार आहे.

मुंबईतील आझाद मैदानासह विविध ठिकाणी दरवर्षी रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या रामलीला कार्यक्रमासाठी मैदानासाठी ५० टक्के सवलत द्या अग्निशमन शुल्क माफ करा, असे निर्देश पालिका प्रशासनाला पालकमंत्री लोढा यांनी दिले होते. दरम्यान, या संदर्भात पालिका मुख्यालयात नुकतीच मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.

या बैठकीत रामलीला कार्यक्रमाचे आयोजक, पोलीस व पालिका अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रामलीला कार्यक्रम आयोजकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर लोढा म्हणाले की, रामलीलाचे आयोजक आपली संस्कृती आणि वारसा पुढे नेत आहेत, त्यामुळे त्यांना योग्य ते सहकार्य करणे गरजेचे आहे. विशेषत: आझाद मैदानावर रामलीला कार्य़क्रम आयोजित केला जातो. येथे कार्यक्रमाच्यावेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

ही बाब लक्षात घेऊन पालिकेने सहकार्य करावे आणि मैदानाचे शुल्क ५० टक्के कमी करावे, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. याकडे लक्ष वेधून प्रशासनाने मैदानाचे शुल्क ५० टक्केने कमी केले आहे. तसेच अग्निशमन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. यासह इतर मागण्यांची पूर्तताही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमासाठी सुविधा

- रामलीला कार्यक्रमासाठी एक खिडकी योजना

- मैदानाचे शुल्क अर्धे आकारले जाणार

- फायर ब्रिग्रेडचे शुल्क पूर्णपणे माप केले जाईल

- रामलीला कार्यक्रमाच्या परिसरातील स्वच्छतेच्यादृष्टीने मोबाईल टॉय़लेट तसेच फवारणी केली जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.