"...तर भाजप हे खपवून घेणार नाही"; प्रवीण दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया

Pravin-Darekar
Pravin-Darekar
Updated on

मुंबई: गेल्या महिन्यापासून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागणार की नाही याची जोरदार चर्चा रंगली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्यास कडक नियम लागू करावे लागतील असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर, 'अगदीच शेवटचा पर्याय म्हणजे लॉकडाउन करावा लागेल' असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. मात्र, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी लॉकडाउनचा तीव्र विरोध केला. "लॉकडाउन केल्याने आपण खड्यात गेलो असं राज्यातील सत्ताधारी म्हणत होते. मग आता पुन्हा लॉकडाउन कशासाठी करत आहात. सर्वसामान्य जनतेच्या पोटपाण्यावर परिणाम होणारा कोणताही निर्णय होणार असेल तर भाजप हे खपवून घेणार नाही", असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

"कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा वाढत होता, तेव्हा पहिल्या टप्यातच योग्य वेळी लॉकडाउन केला असता, तर कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असता. मात्र तो योग्य पद्धतीने केला नाही, म्हणून कोरोना प्रादुर्भाव वाढला. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी गोरगरिबांना रोख रक्कम देऊन मदत करण्याची मागणी केली होती. आता हीच मागणी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांच्या मताचं स्वागत करतो. हे सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरलंय. त्याचं मुख्य कारण सरकारमधील अंतर्गत कलह आणि समन्वयाचा अभाव. यामुळेच कोरोनाला रोखण्याचं नियोजन कोलमडलं आणि त्याची जबाबदारी सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी घ्यावी", असे दरेकर म्हणाले.

"नाशिकमध्ये योग्य उपचाराअभावी एका रूग्णाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नाशिकमध्ये मी दौरा केला होता. त्या ठिकणी बेड उपलब्ध नाहीत. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो. पण फारसा फरक दिसत नाही. म्हणूनच मी मागणी करतो की नाशिक प्रकरणात संबंधित अधिकारी आणि इतर लोक यांच्यासह सरकारवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे", अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकरांनी दिली.

मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा!- संजय राऊत

"लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान होते हे मला माहिती आहे. साऱ्यांनाच याची कल्पना आहे. पण तरीही पंतप्रधान मोदी यांनी पाच-सहा महिने लॉकडाउन केला होता. जनतेची काळजी असते तेव्हा काही निर्णय घ्यावेच लागतात. त्यामुळे लॉकडाउनचे राजकारण करू नये", असं राऊत म्हणाले. "राज्यातील लॉकडाउनच्या मुद्द्याचं राजकारण कोणीही करू नये. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जे काही सांगत आहेत ते राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी सांगत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आणि त्यांच्या घटक पक्षांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा", असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.