मोदींवर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना प्रवीण दरेकरांचा टोला

मोदींवर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना प्रवीण दरेकरांचा टोला संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर केली होती टीका BJP Pravin Darekar slam Shivsena Sanjay Raut over Mahabharat Editorial
Pravin-Darekar
Pravin-Darekar
Updated on

संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर केली होती टीका

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भूमिका प्रसंगानुसार कायम बदलत असतात. त्यांनी जर त्यांच्या इतिहासातील बदललेल्या भूमिकांचा अभ्यास केला तर त्यांना समजेल की ते नक्की महाभारतात कोठे आहेत? संजय राऊत अस्वस्थ आहेत. कारण महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस आहे. ही महाविकास आघाडी तयार करण्यामध्ये संजय राऊत यांचा महत्त्वाचा वाटा होता. आता ती आघाडी मोडकळीत येत असल्याचं पाहून ते भांबावलेले आहेत. म्हणूनच महाभारताचे दाखले देत आम्ही कसे बरोबर आणि विरोधक कसे चूक हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना लगावला. (BJP Pravin Darekar slam Shivsena Sanjay Raut over Mahabharat Editorial)

Pravin-Darekar
जेव्हा हातातली सत्ता जाईल तेव्हा...; निलेश राणेंचे चॅलेंज

'सामना'च्या अग्रलेखात महाभारतातील काही दाखले देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा रथ रणांगणात मध्यभागी नेऊन ठेवण्यात आला आहे आणि केंद्रीय यंत्रणा चहुबाजूंनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा आशयाचे मत या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर टीका केली.

Pravin-Darekar
'अगली बार पथर नही कुछ और होगा',भाजपाच्या हाजी अरफात शेखना धमकी
Sanjay Raut
Sanjay Raut

पंतप्रधान मोदी हे ध्येयाने पछाडलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका होत असली तरी त्यांनी विकासकामे सुरूच ठेवली आहे. एखाद्या पालकाप्रमाणे देशाचा पंतप्रधान देशवासीयांचा सांभाळ करत आहे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोरोना संकटकाळात केंद्र सरकारकडून प्रत्येक विभागासाठी आर्थिक मदत करण्यात आली. अनेक राज्यांनी केंद्राला अनुसरून पॅकेज तयार केले पण महाराष्ट्रात मात्र पॅकेज दिलं गेलेलं नाही. त्यामुळे 'आलं अंगावर की ढकल केंद्रावर', ही एककलमी कार्यपद्धती ठाकरे सरकार राबवत आहे.

Pravin-Darekar
संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..."

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. एखादया विषयाचं निवेदन राज्यपालांना देण्यात आलं तर लगेच ते पुढे राज्यपाल पाठवतात. त्यात काहीच गैर नाही. आता त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला हवा, असे मत दरेकर यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.