भाजपच्या फटकार मोर्चाला शिवसैनिकांकडून उत्तर; तुंबळ हाणमारी
मुंबई: अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत घोटाळा झाल्याचे कागदोपत्री आरोप आपच्या नेत्यांनी केले. मंदिर बांधणीबाबत जमिनीचा जो व्यवहार झाला, त्यातील कागदपत्रे खोटी आणि बनावट असल्याचं वक्तव्य शिवसेनेकडून करण्यात आले. तसेच, या जमिनीबाबत घोटाळा झाल्याचा संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिवसेनेविरोधात फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या विरोधात 'फटकार मोर्चा' आयोजित करण्यात आला असून भाजप यासंबंधी आक्रमक झाली. या मोर्चाची शिवसैनिकांना माहिती मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनाजवळ पोहोचायच्या आधीच अनेक शिवसैनिक हे सेना भवनाच्या परिसरात जमल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आणि शिवसेना भवनच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर राडा पाहायला मिळाला. तेथील पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. (BJP Protest Sena Bhavan Mumbai Fatkar Morcha Ram Mandir Issue Shivsena Leaders Fight clash between political workers)
मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आंदोलन करण्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढणार आहेत आणि शिवसेना भवनच्या परिसरात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची माहिती शिवसैनिकांना समजल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या लोकांना या परिसरात आम्ही आंदोलन करू देणार नाही. जर आंदोलन केलं तर आम्ही त्या लोकांना सोडणार नाही, अशा प्रकारचा इशारा शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी दिला आहे.
"राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेने अनेक आंदोलने केली. ज्यावेळी वादग्रस्त साचा पाडण्यात आला होता, तेव्हा शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांनी असं म्हणण्याची हिंमत दाखवली होती की तो साचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला अभिमान आहे. त्यावेळी भाजपचे कोणीही लोक पुढे आलेले नव्हते. आणि आज जर ते लोक राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर चाल करून येणार असतील, तर शिवसैनिक गप्प बसणार नाही", असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
"शिवसेनेच्या आरोपांमुळे भाजपच्या भावना दुखावल्याचे ते म्हणत असतील आणि त्यासाठी ते रोज रोज सेना भवनावर चाल करून येणार असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. भाजपचे लोक इथेपर्यंत येऊ शकतील की नाही हे मला माहिती नाही. पण जर ते लोक इथे येऊन आंदोलन करत असतील तर शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत", असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.