"ठाकरे सरकारची वागणूक सचिन वाझेंचे प्रवक्ता असल्यासारखी"; भाजप नेत्याचं टीकास्त्र

Uddhav-Thackeray-1
Uddhav-Thackeray-1
Updated on

मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटामध्ये सहभागी असल्याचा आरोप करत शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना रात्री अटक केली. सचिन वाझे यांच्यावर सर्वप्रथम मनसुख हिरेन यांच्या हत्येचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला होता. याच मुद्द्यावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंच्या अटकेची आणि निलंबनाची मागणी केली होती. पण त्यावेळी सचिन वाझेंची दुसऱ्या खात्यात बदली करण्यात आली. अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेने जेव्हा तपासाची सूत्रे हाती घेतली, त्यानंतर तब्बल १२ तास सचिन वाझेंची चौकशी झाली आणि त्यांनी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची मागणी आहे की त्यांचे सरकार ज्या सचिन वाझेंचे प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत होते, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. अखेर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. आता तरी महाराष्ट्र सरकार देशाची माफी मागत सचिन वाझेंची नार्को टेस्ट करणार का?, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करायचे आदेश द्यायला हवे. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल आणि महाराष्ट्राचे सरकार नक्की कोणाला पाठीशी घालायचा प्रयत्न करतंय तेदेखील समोर येईल अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली. तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना 'एनआयए'ने अटक केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅण्टिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. जी गाडी अंबानी यांच्या घराबाहेर सापडली, तिचे मालक मनसुख हिरेन हे सचिन वाझे यांना आधीपासून ओळखत होते. संबधित गाडी ही वाझे यांच्याजवळ होती, असे आरोप वाझेंवर होते. याच प्रकरणात अखेर त्यांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.