Latest Marathi News: शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ॲड. आशीष शेलार यांनी मंगळवारी (ता.५) केले. हे समर्थन केवळ शिवडीपुरते मर्यादित असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. .Mns: इतिहासात पहिल्यांदाच; या जिल्ह्यात केली मनसेने एंट्री, कोणाचं गणित बिघडणार? .शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार शेलार म्हणाले, ‘ज्या अपक्षाने भाजपचा उल्लेख केला त्याला आमचे समर्थन नाही. कारण कुठलाही संवाद, चर्चा न करता, थेट अर्ज भरण्यात आला. मतदारांचा विचार करून उमेदवार कोण, हे पाहिले तर बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी हे दोघे याठिकाणी रिंगणात आहेत. .ठाण्यात भाजप पदाधिकार्याचे मैत्रीचे होर्डिंग.त्यामुळे काही प्रमेय ठरवून मूल्यमापन करावे लागेल, लोकांची कामे होण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. भाजप विचारावर चालणारी आहे. त्यामुळे विचारधारा डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे, असेही शेलार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर ही निशाना साधला ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा दगाबाज म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले जाईल. शिवडी हा वारकऱ्यांचा विभाग आहे. उद्धवजी आषाढीला पंढरपूरला गेले, पण पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करणार नाही ही भूमिका घेतली. कोरोनाकाळात जेव्हा लोक देवाचा धावा करीत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंदिरे बंद केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिल्याचा आरोप शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला..MNS 150 जागा जिंकत असेल तर BJP ला फक्त 50! राज ठाकरेंच्या भूमिकेवर बड्या नेत्याचा वार, अमितच्या उमेदवारीवर स्पष्ट सांगितलं.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.