'ति'च्या व्यक्तीगत आयुष्याचा बाजार मांडण्याचा अधिकार नवाब मलिक यांना कोणी दिला?'

"एका टि्वटवरुन गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री एका महिलेची बदनामी होत असताना, गप्प कसे?"
Chitra Wagh
Chitra Waghsakal
Updated on

मुंबई: "महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (nawab malik) हे माध्यमांसमोर एका महिलेची कौटुंबिक विषयांबाबत बदनामी करत आहेत. ते काझी खरं बोलत आहेत, की तिच्याजवळ असलेली कागदपत्र खरी आहेत, याची शहानिशा न्यायालयीन प्रक्रियेतून होऊ शकते" असे चित्रा वाघ (chitra wagh) यांनी म्हटले आहे. त्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

"परंतु अशाप्रकारे एका महिलेच्या व्यक्तीगत आयुष्याचा बाजार मांडण्याचा अधिकार नवाब मलिक यांना कोणी दिला? खरंतर एका टि्वटवरुन गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री एका महिलेची बदनामी होत असताना, गप्प कसे?" असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

Chitra Wagh
शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला- क्रांती रेडकर

"यावरुन एक गोष्ट सिद्ध होते, काँग्रेसी वृत्तीने साम, दाम, दंड भेद ही वृत्ती वापरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत हरवलं होतं. तीच काँग्रेसी प्रवृती सत्तेवर येते, तेव्हा दलित आणि शोषितांवर अन्याय होतो" अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.