Mumbai Blood Bank : मुंबईतल्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा, शस्त्रक्रिया लांबणार?

रक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णांचे नातेवाईक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा शोध घेण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले.
blood bank
blood bankesakal
Updated on

Mumbai Blood Bank : मुंबईमध्ये आणि आसपासच्या उपनगरांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच हा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांमध्ये आणि रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रूग्णांचे नातेवाईक ब्लड बॅंकांमध्ये रक्ताचा शोध घेण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. शहरातील अनेक ब्लडबॅंकांनी त्यांच्याकडे मोजक्याच ब्लड ग्रुप्सचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. रक्ताच्या या तुटवड्यामुळे नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते.

यासंदर्भातले वृत्त 'टाईम्स ऑफ इंडियाने' दिले आहे. मुंबईतल्या भांडूपचे रहिवासी असिफ शेख यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, असिफ शेख यांच्या मातोश्री फरिदून (वय ५७) यांच्यावर आज बायपास शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

या शस्रक्रियेसाठी फरिदून यांना कळव्यातील आनंद दिघे हार्टकेअर सेंटरमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी A निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्या रक्ताची आवश्यकता आहे.

त्यासाठी, असिफ शेख यांनी रविवारी २० पेक्षा अधिक ब्लड बॅंकांमध्ये संपर्क साधला. मात्र, त्यापैकी १३-१४ ब्लड बॅंकांनीच त्यांना प्रतिसाद दिला. या ब्लड बॅंकांनी असिफ यांना सांगितले की, त्यांच्याकडे रक्त शिल्लक नाही.

blood bank
Mumbai News: 12वी पास 'डॉक्टर'चा रुग्णांच्या जीवाशी खेळ; पाच वर्षांपासून चालवत होता दवाखाना, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

फरिदून यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर या शस्त्रक्रियेच्या संदर्भात रविवारी उशिरा असिफ यांना माहिती देणार होते. परंतु, रक्त मिळत नसल्यामुळे असिफ यांचा अजूनही रक्तासाठी शोध सुरू आहे, अशी माहिती असिफ यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.

'टाईम्स ऑफ इंडियाच्या' रिपोर्टनुसार, दिवाळीमुळे मर्यादित स्वरूपात रक्तदान मोहिम राबवण्यात आली होती. त्यामुळे, शहरात आणि आसपासच्या भागांमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.

रविवारी, बीवायएल नायर रुग्णालय वगळता अनेक ब्लड बॅंकांमधील रक्ताचा साठा हा शून्यावर आला होता. शिवाय, रक्तसाठा उपलब्ध आहे का? अशी विचारणा डॉक्टर आणि रक्तपेढीचे कर्मचारी यांच्यामध्ये सुरू होती. परिणामी, या रक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात रक्तदान शिबीरे पुन्हा सुरू झाली आहेत, त्यामुळे, या आठवड्यात परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. त्यामुळे, रूग्णाची आणि रूग्णाच्या नातेवाईकांची रक्तासाठीची वणवण थांबण्यास मदत होईल.

blood bank
Mumbai : मुंबईचं जीवन डॉक्टरानं मोबाईलमध्ये केलं 'क्लिक'; वैद्यकीय सेवेतून वेळ काढत बक्षींनी जपला फोटोग्राफीचा छंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.