मुंबईची आता 'तुंबई' होणार नाही? महापालिका करणार तब्बल 21 कोटी रुपये खर्च

Mumbai Flood
Mumbai Floodsakal media
Updated on

मुंबई : ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 3 हजार कोटी रुपयांच्या आसपास खर्च झाल्यानंतरही मुंबईतील पूरपरिस्थिती (Mumbai Flood) नियंत्रणात येत नाही. त्यामुळे आता नवनवे प्रयोग (New Experiment) केले जात आहे. पश्‍चिम उपनगरातील (Western Mumbai) ज्या भागात पाणी साचते त्या ठिकाणच्या पर्जन्यवाहीन्यांचे रुंदीकरण करणे, नवीन वाहीन्या टाकण्याची कामे करण्यात येणार आहे.सांताक्रुझ,अंधेरी,कांदिवली,बोरीवली दहिसर या भागातील स्थानिक पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी महानगर पालिकेने लोकल आराखडा तयार केला आहे. यासाठी महानगरपालिका (BMC) 21 कोटी रुपयांचा खर्च (21 Crore Expenses ) करणार आहे. या भागातील स्थानिक गरजेनुसार पर्जन्यवाहीन्यांची रुंदी वाढविणे,नव्या पर्जन्यवाहीन्या टाकणे,नवे चेंबर बांधणे अशी कामे करण्यात येणार आहे. (BMC 21 crore rs to Control over Mumbai and Suburban Flood Situation)

Mumbai Flood
गर्भपातासाठी कायमस्वरुपी वैद्यकीय मंडळाची अद्याप प्रतिक्षाच!

कांदिवली,बोरीवली भागात पर्जन्यवाहीन्या बांधणे,पर्जन्य वाहीन्यांची रुंदी वाढवणे,क्रास कलव्हर्ट बांधणे अशी कामे 6 ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन काेटी 75 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर,अंधेरी पूर्व येथील सहार कार्गो हब येथे ओढावणाऱ्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या भागातील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सहार पोलीस ठाणे,सहार गाव,कार्गोहब या भागांना दिलासा मिळणार आहे. नाल्याच्या आड येणाऱी इंधनवाहीनीही हटविण्यात येणार आहे.या कामासाठी 11 कोटी 62 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे प्रस्ताव महासभेत मांडण्यात आले आहे.

लिंकींग रोडला दिलासा

सांताक्रुझ पश्‍चिम येथील लिंकींग रोड येथे नव्या पर्जन्यवाहीन्या टाकण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला 1.2 मिटर व्यासाची नवी वाहीनी टाकण्यात येणार आहे. तसेच इतर काही भागातही पर्जन्यवाहीन्यांची रुंदी वाढविण्या बरोबर नव्या वाहीन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी 3 कोटी 42 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

दहिसर सबवेला हिंदमाता फॉर्म्युला

हिंदमाता येथे ज्या प्रमाणे पावसाचे पाणी भुमिगत टाक्यांमध्ये साठविण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे दहिसर सबवेच्या दोन्ही बाजूला चेंबरर्स बांधण्यात येणार आहे. या चेंबरमध्ये पावसाचे पाणी साठवून ते नाल्यात पंपच्या सहाय्याने सोडण्यात येणार आहे.त्याच बरोबर या परीसरात नव्या पर्जन्यवाहीन्याही बांधण्यात येणार आहे.यासाठी 1 कोटी 47 लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.