विहार, तुळशी, पवई धरणाच्या मजबुतीसाठी BMC चा 'हा' आहे प्लॅन

Vihar dam
Vihar damsakal media
Updated on

मुंबई: विहार,तुळशीसह पवई धरणाच्या (Powai Dam) स्थैर्यतेची चाचणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) सल्लगाराची नियुक्ती करणार आहे. तसेच,आवश्‍यकता भासल्यास या धरणाची डागडुजी (Dam Repairing) करण्यात येणार आहे. ही तिनही धरणे 125 ते 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आली. बांधरा पध्दतीची ही धरणं असून त्यांची नियमीत तपासणी केली जाते. त्याच प्रमाणे आता या धरणाच्या स्थैर्यतेच्या चाचणी (Dam testing) करण्यात येणार आहे.तसेच,गरज पडल्यास धरणांची डागडूजी करण्यात येणार आहे. ( BMC appoints advisory person for dam stability testing work - nss91)

यासाठी राज्य सरकारच्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना या तज्ञ संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी 15 लाख रुपयांचे शुल्क देण्यात येणार आहे.ही संस्था स्थैर्यतेची चाचणी करण्या बरोबर आवश्‍यकता भासल्यास धरणाच्या डागडुजीसाठीही सल्ला देण्याचे महत्वाचे काम करणार आहे.हा प्रस्ताव येत्या आठवड्यात होणाऱ्या महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

Vihar dam
BMC: मुंबईत १६ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला सुरुवात, जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी धरणाची तपासणी करुन घ्यावी लागते.त्यानुसार हे काम करण्यात येत आहे.असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.तसेच,या धरणांची जल व विद्युत संस्थेने नॉन डीस्ट्रीक्‍टीव्ह पध्दतीची चाचणी करण्यात आली आहे.यात,धरणाची क्षमता तपासण्यात आली असून त्याचा अहवाल मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेला देण्यात आला आहे.असेही सांगण्यात आले. पवई धरण हे 1890 मध्ये बांधण्यात आले होते.या तलावातील पाण्याचा वापर सध्या पिण्यासाठी केला जात नाही.फक्त औद्योगिक वापरासाठी हे पाणी वापरले जाते.पुर्ण भरल्यावर यया धरणात 5 हजार 450 दशलक्ष लिटर पाणीसाठा असतो.

विहार धरण 1859 मध्ये बांधण्यात आले आहेत.मुंबईला पाणीपुरवठा करणारे पहिले धरण आहे.हा तलाव पुर्ण भरल्यानंतर त्यात 27 हजार 698 दशलक्ष लिटर पाणीसाठा राहातो.या तलावातून मुंबईला रोज 90 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होता. तुळशी धरण 1879 मध्ये बांधण्यात आले.तलाव पुर्ण भरल्यावर 8 हजार 46 दशलक्ष लिटर पाणीसाठा असतो.या तलावातून रोज 18 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा मुंबईला केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()