Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या; अखेर ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Kishori Pednekar
Kishori Pednekaresakal
Updated on

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. महपालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BMC Body Bag Scam Kishori Pednekar ED FIR Mumbai News)

महिन्याभरापूर्वी ईडीनं पेडणेकरांविरोधातील आरोपांप्रकरणाची कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून मागवली होती. या विभागाकडून पेडणेकरांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या आधारे कागदपत्रे तपासल्यानंतर ईडीनं किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पेडणेकरांवर आरोप काय?

कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे विभागाकडून गुन्हा

या कथीत आरोपांनंतर मुंबईतील अग्रीपाडा पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट २०२३ रोजी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा तर कलम १२० ब अंतर्गत जाणीवपूर्वक कारस्थान करुन घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महापालिकेत कोविड काळात कथीत चार मोठे घोटाळे झाल्याचे आरोप असून त्यांपैकी बॉडी बॅग घोटाळा एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.