बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात येत आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात येत आहे. सुरुवातीला शिक्षण समितीस अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात येतोय. मुंबई महापालिकेचे शिक्षण बजेट सादर करण्यात आले. उपायुक्त अजित कुंभार यांच्याकडून शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांना अर्थसंकल्प सादर केला. (BMC budget 2022)
मुंबई महापालिकेचे यंदाच्या वर्षीचे शिक्षण बजेट ३ हजार ३७० कोटी २४ लाख रुपयांचे आहे. अर्थसंकल्प 'ई' निधी संकेतांक ३० अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹२७०१.७७ कोटी एवढे असून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹२८७०.२४ कोटी इतके प्रस्तावित आहे.
तसेच अर्थसंकल्प 'ई' निधी संकेतांक ३० अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षाच्या भांडवली अर्थसंकल्पात ₹२४४.०१ कोटीची प्रस्तावित करण्यात आलेली तरतूद सुधारित अंदाजात ₹२७९.२८ कोटी इतकी प्रस्तावित केली आहे. तसेच सन २०२२-२३ या वर्षासाठी भांडवली कामांच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹५००.०० कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे.
राज्य सरकारकडूनच मुंबई महापालिकेची मोठी थकबाकी येणे बाकी
सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी शासनाच्या विवीध कार्यालयांकडून ६७६८.१६ कोटी येणे बाकी
शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी ४८४०.६१ कोटी येणे बाकी
मुंबई महानगर पालिकेचा अ आणि ब चा यंदाचा अर्थसंकल्प सादर
इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर
४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.७० टक्यांची वाढ
गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता
- मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमासाठी ८०० कोटी
- व्हाट्सअप्प चाट बॉट्स साठी ७८ कोटी
निवडणूकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या `वापरकर्ता शुल्काची´ घोषणा
कचरा निर्मीती करणा-यांना भरावा लागणार वापरकर्ता शुल्क
वर्षासा वापरकर्ता शुल्कातून १७४ कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य
मुंबईतील ३५०० उपहारगृहांनाही आता भरावं लागणार कच-याकरता वापरकर्ता शुल्क
या सर्व उपहारगृहातून येणा-या ३०० टन ओल्या कच-यावर महापालिकेला २६ कोटींचं वापरकर्ता शुल्क मिळणार
पर्यावरण खात्याच्या एक भाग म्हणून हवामान कृती कक्षाची निर्मिती करण्याकरिता ₹1 कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प
मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यावर सुयोग्य तंत्रज्ञान वापर करून जमीन पुनर्प्राप्ती करणे
कचऱ्याचे संकलन याकरिता १६७.८७ कोटी तरतूद
मुंबईतील कोविड संकट काळातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मोठा खर्च केला जाणार
राज्य आपत्ती प्रतीसाद व्यवस्थापनाकडून २७६४.८८ कोटींची मागणी केलीय
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपल्या घराशेजारी आरोग्य केंद्र
मुंबईत उभारणार २०० हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र
एकूण ४०० कोटी रूपयांची तरतूद
नव्या शाळांसाठी भरीव तरतूद नाही
मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक बजेटमध्ये मुंबईतील नव्या शाळांकरता भरीव तरतूद करण्यात आली नसल्याचं दिसतं. मुंबई पब्लिक स्कुलच्या शाळांची संख्या वाढवण्याची घोषणा हवेतच विरली? का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आदित्य ठाकरेंनी प्रत्येक वॉर्डमध्ये राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय बोर्डाची शाळा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये केंब्रिज आणि आय.बी बोर्डाच्या प्रत्येकी एक अश्या केवळ दोनच नव्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची घोषणा करण्यात आली आहे. केवळ २ नव्या शाळांकरता १५ कोटींच्या तरतुदीव्यतिरीक्त कोणतीही भरीव तरतूद नाही.
BMC अर्थसंकल्पाचे अपडेट्स
व्हर्च्युअल ट्रेंनींग सेंटर साठी- ३८ कोटी २ लाख
थिंकींग लॅब साठी- 29 लॅब
(या प्रकल्पाद्वारे २५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता वाढून विकास होईल )
डिजीटल क्लासरुम- २८ लाख तरतुद
शाळा इमारतींची दुरुस्ती, पुर्नबांधणी - ४१९ कोटी
शाळांची देखभाल- स्वच्छतेसाठी- 75 कोटी
यंदा केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार
या नव्या २ शाळांकरता १५ कोटी़ची तरतुद
खगोलशास्त्रीय प्रयेगशाळांकरता- 75 लाख
खाजगी प्राथमिक शळांना महानगरपालिकेकडून अनुदान- ४१४ कोटी
सध्या सिबीएससी च्या ११ आणि आयसीएससी बोर्डाची १ अश्या एकूण १२ शाळा मुंबईत सुरु आहेत
मुंबई महापालिका शिक्षण बजेटवर आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण विभागाचा ठसा
मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जंगल सफारी, निसर्ग उद्यान,अभयारण्यांना भेटी घडवणार- तरतुद ३१ लाख
शाळांच्या अग्निशमन यंत्रणेकरता- २.६४ कोटींची तरतुद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.