लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज : मुंबईत 35 लाख मुलांचं टार्गेट

CHILD VACCINATION
CHILD VACCINATIONsakal media
Updated on

मुंबई : 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी (children) अखेर लसीकरणाची परवानगी (corona vaccination) मिळाली. मुंबईत साधारणता 35 लाख मुलांचे लसीकरण लसीकरण करावे लागणार आहे. मुलांच्या लसीकरणाची तयारी पालिकेने (bmc) केली असून दिवाळीपासून लसीकरण सुरू करण्याची तयारी पालिकेची आहे. मुलांच्या लसीकरणाची नियमावली (vaccination rules) आल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल, असे महागरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी सांगितले.

CHILD VACCINATION
मुंबईकरांना मलेरियाचा ताप वाढला; डेंग्यू, गॅस्ट्रोचे लक्षणीय रुग्ण

कोव्होवॅक्स आणि या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत लसींचा साठा येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होईल. त्यानंतर इतर वयोगटातील मुलांचे लसीकरण होईल. सध्या मुंबईत 517 लसीकरण केंद्र आहेत. याच केंद्रांवर मुलांसाठी लसीकरणाची वेगळी व्यवस्था केली जाईल. केंद्र सरकारकडून परवानगी आणि नियमावली आल्यानंतर लसीकरणाला सुरुवात होईल असे ही काकाणी यांनी पुढे सांगितले. लहान लसीचा प्रभाव देखील प्रौढां प्रमाणेच असल्याचे दिसून आले आहे.

CHILD VACCINATION
सामाजिक संघटनांची दादरमध्ये निदर्शने; दहशतवादी हल्ल्याचा निषेध

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लस अत्यंत सुरक्षित आहेत. डब्ल्यूएचओची मान्यता एका आठवड्यात अपेक्षित आहे असे मासिना हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोग विशेषज्ञ, डॉ तृप्ती गिलाडा यांनी सांगितले. आपण कोविड विरूद्ध लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. मुलांचे लसीकरण झाले तर, शाळा जानेवारीमध्ये पूर्णपणे उघडण्याची आपण अपेक्षा करू शकतो. आता आपल्याला फक्त लस उत्पादन वाढवण्याची गरज आहे. लहान मुलांचे लसीकरणाच्या विश्वासार्ह आहे त्यामुळे त्याकडे संशयाने बघू नये. मुलांच्या इतर लसीकरणाप्रमाणे ही मोहीम देखील यशस्वी होईल असा विश्वास ही गिलाडा यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()