मुंबई, ता.25 : इंडो अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा कोविड क्रुसेडर्स अवॉर्ड 2020 या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत कोविड प्रतिबंधासाठी केलेल्या कामाबद्दल भारतातील प्रशासकीय अधिकारी संवर्गातून इकबाल सिंह चहल हे विजेते ठरले आहेत.
या पुरस्कार संवर्गासाठी प्रारंभी 76 जणांची नावे विचाराधीन होती. पुरस्कारासाठी ठरवलेल्या निकषांच्या आधारे 41 जणांची नावे नामांकन म्हणून निश्चित करण्यात आली. त्यातून आयुक्त चहल यांची निवड करण्यात आली. राज्यपल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन स्वरुपात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात चहल यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दुतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेेळी अमेरिकेचे मुंबईतील राजदूत डेव्हिड जे. रांज, इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यलक्ष्मी राव, पश्चिम विभागाचे अध्यक्ष नौशाद पंजवानी, आनंद देसाई, पूर्वी चोथानी, प्रादेशिक संचालक राखी पांडा यांची उपस्थिती होते. भारतासह अमेरिकेतूनही विविध मान्यवर, तज्ज्ञ, पुरस्कार विजेते, नागरिक या सोहळ्यात ऑनलाईन जोडले गेले होते.
पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आयुक्त चहल म्हणाले की, पुरस्कार स्वीकारणे ही गौरवाची बाब आहे. कोविड काळामध्ये करण्यात आलेली कामगिरी ही देशाची सेवा तर आहेच सोबत मानवतेची देखील आहे.
टिम BMC चा गौरव
महानगरपालिकेची यंत्रणा ही एकदिलाने राबली आहे. हे प्रयत्न करताना चाचण्या, रुग्णवाहिका, व्यवस्थापन, रुग्णालये व्यवस्थापन या चार स्तंभाना बळकट करण्यावर भर दिला. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईमध्ये कर्तव्य बजावताना “टीम बीएमसी” ने २०० पेक्षा अधिक सहकार्यांना गमावले आहे. तर ५ हजारापेक्षा अधिक सहकारी कोरोना बाधित झाले आहेत. पण आम्ही थांबलो नाहीत आणि त्यासाठी मी सर्वांना नमनही करतो. माझ्यासोबत नामांकन झालेल्या व्यक्तीदेखील पुरस्कारासाठी तितक्याच पात्र आहेत आणि ते समान अर्थाने विजेतेदेखील आहेत, अशी माझी भावना आहे. राज्य सरकार, सर्व लोकप्रतिनिधी, मुंबईकर नागरिक, वेगवेगळ्या संस्था, रुग्णालये, विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, माझे सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी असा सर्वांचा कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यात वाटा असून तेदेखील या पुरस्काराचे मानकरी आहेत. असेही आयुक्तांनी नमुद केले.
bmc commissioner iqbal singh chahal awarded by covid crusader 2020 award
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.