मुंबई : येत्या २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरु होणार आहे. याविषयीची माहिती केंद्र सरकाराकडून देण्यात आली होती. केंद्राने स्पष्ट केल्यानंतर महापालिकादेखील सज्ज झाली असून ५०० लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मात्र, ऐनवेळी पालिकेला लशींसाठी धावाधाव करावी लागत आहे. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे लस उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा सुरु आल्याची सांगण्यात येत आहे. याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (bmc-demands-to-provide-corona-vaccine-for-mumbai)
मुंबईमध्ये मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर वाढला. हा जोर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांनी लसीकरणाला गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता लसींचा मात्र तुटवडा भासू लागला आहे. लसीकरण मोठ्या संख्येने होत असताना लस उत्पादक कंपन्यांकडून लसीचा पुरवठा कमी होत होता. यामुळे अनेक वेळा लसीकरण बंद ठेवावे लागले होते.
मुंबईमध्ये लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी पालिकेने ग्लोबल टेंडर काढून 1 कोटी लसीचे डोस विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही पुरवठादार त्यात पात्र न ठरल्यामुळे ते ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आले. ग्लोबल टेंडर रद्द झाल्याने आता लसीकरणासाठी लस उपलब्ध कशी करायची हा नवा पेच पालिकेसमोर आहे. म्हणूनच, पर्याप्त स्वरूपात लसींचा पुरवठा व्हावा यासाठी पालिकेने लसीच्या उत्पादक कंपन्यांसोबत बोलणी सुरु ठेवली आहे. कंपन्यांकडून लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
लस उपलब्ध झाली तरच सर्व केंद्र सुरू राहतील
"मुंबईमध्ये सध्या लसीकरण करण्यासाठी पालिका, सरकारी आणि खासगी 300 लसीकरण केंद्र सुरु आहेत. ही लसीकरण केंद्र वाढवण्यात येत आहेत. मुंबईत आणखी 200 लसीकरण केंद्र वाढवून 500 लसीकरण केंद्र सुरु करणार आहोत. जास्त प्रमाणात लस आल्यास ती सर्व लसीकरण केंद्र सुरु केली जातील. लस जास्त प्रमाणात आली नाही तर काही लसीकरण केंद्र सुरु ठेवली जातील", असे काकाणी यांनी सांगितले.
संपादन : शर्वरी जोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.