मुंबई : पालिका निवडणुकीसाठी भाजपला हवा चेहरा!

शिवधनुष्य पेलण्यासाठी टास्क फोर्समध्ये मंथन
BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : शिवसेनेचे प्राण असलेल्या मुंबई महापालिकेत (BMC) विजयश्री कशी खेचायची यासाठी भाजपमध्ये विचारमंथन (BJP Discussion) सुरू आहे. टास्क फोर्सच्या (task force) नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांशी (marathi and north indian voters) कसा संपर्क साधायचा (contact) यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी खल केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला (bmc election) सामोरे जायला एक चेहरा हवा, अशी मागणीही केली जात आहे. मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat Lodha) यांनी अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, अशी टास्क फोर्सची इच्छा आहे.

BMC
मुंबईला दिलासा; तिसर्‍यांदाही डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण नाही

मराठी, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार एकत्रितपणे बाहेर पडल्यास निवडणूक फारशी जड नाही; परंतु संघटनेत समन्वय हवा, असे बैठकीत लक्षात आणून देण्यात आले. भाजपने पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्ता असताना जे यश मुंबईत मिळवले त्याची पुनरावृत्ती करायची असेल तर घरोघरी संपर्क, मतदारांशी संवाद आदी उपक्रमांवर भर द्यावा लागेल. दिवाळीपर्यंत त्या संदर्भात रणनीती आखण्याचा मानस व्यक्त केला जात आहे. त्यासंदर्भात त्वरित हालचाली व्हाव्यात, असे बैठकीत सांगण्यात आले.

BMC
मुंबई : पश्चिम रेल्वेवर नवा पूल प्रवाशांसाठी खुला

पाच वर्षांपूर्वी ॲड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवण्यात आली होती. या वेळी मंगलप्रभात लोढा अमराठी नेते असले तरी त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नेत्यांनी एकत्र यावे; परंतु त्यासाठी सर्वांनी त्यांचे नेतृत्व मान्य करायला हवे, असे सांगितले गेल्याचे समजते. लोढा यांनी सर्वांशी उत्तम संपर्क ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले.

‘सर्वांना सोबत घ्या’

शिवसेना महापालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याने ती जिंकणे भाजपसाठी आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. भाजपमध्ये बाहेरून आलेल्या मंडळींना पूर्ण महत्त्व न देता सर्वांना सोबत घ्यावे, अशी भावनाही काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.