दुसऱ्या टप्प्यातील इमारतींमधील सिरो सर्व्हेक्षणाआधी BMC कडून केलं जातंय 'हे' महत्त्वाचं काम

दुसऱ्या टप्प्यातील इमारतींमधील सिरो सर्व्हेक्षणाआधी BMC कडून केलं जातंय 'हे' महत्त्वाचं काम
Updated on

मुंबई - मुंबईतील पहिल्या सिरो सर्व्हेला बऱ्याच ठिकाणी विरोध झाला होता. त्यातून कसाबसा मार्ग काढणाऱ्या पालिकेला आता सिरो सर्व्हेबाबत सोसायटीच्या पदाधि-यांना समजावण्यास सुरूवात केली आहे. पुढील आठवड्यात सिरो सर्व्हेच्या दुस-या टप्प्याला सुरूवात करण्यात येणार आहे.

मुंबई पालिकेने जुलै महिन्यात स्लम आणि नॉन स्लम परिसरात सिरो सर्व्हे केला होता. मुंबईतील आर उत्तर-दहिसर, एम वेस्ट-चेंबूर,तिलकनगर,एफ उत्तर - वडाळा, सायन, माटूंगा या तिनही विभागात सर्व्हे केला होता. पहिल्या सर्व्हेत नॉन स्लममधून 4 हजार सॅम्पल घेण्यात येणार होते. मात्र काही इमारतींमधील रहिवाश्यांनी विरोध केल्याने केवळ 2707 इतकेच सँपल घेण्यात आले. त्यामुळे इमारतींमध्ये राहणा-या रहिवाश्यांचा अपेक्षित सर्व्हे झाला नाही. त्यामुळे पालिकेने आता लोकांच्या जनजागृतीवर भर दिला आहे.

काय आहे सिरो सर्व्हे 

सिरो सर्व्हेमध्ये व्यक्तीच्या शरिरातील रक्त घेवून त्याची अँटीबॉडी टेस्ट केली जाते. जर एखादा व्यक्ती कोरोनाबाधित होऊन गेला असेल तर त्याच्या शरिरात विकसित झालेल्या अँटीबॉडीची माहीती या सर्व्हेतून मिळणार आहे. या माहितीमुळे कम्यूनिटी स्तरावर हा आजार किती प्रमाणात पसरला आहे याची देखील माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

नॉन स्लम परिसरातील लोकांनी या सिरो सर्व्हेमध्ये सहकार्य  करावे, यासाठी विभाग अधिकारी तसेच स्वयंसेवक घराघरात जाऊन लोकांना समजावत असल्याची माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ दक्षा शाह यांनी सांगितले. 

अँटीबॉडी टेस्ट बाबत लोकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज तसेच भिती देखील आहे. त्यामुळे लोकं या टेस्टसाठी फारसे उत्सूक दिसत नाहीत. मात्र त्यांच्या मनातील ही भिती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र स्लमपेक्षा इमारतींमधील रहिवाशी अँटीबॊदुई टेस्टला अधिक विरोध करत असल्याचे  एम पश्चिम विभागातील एका स्वयंसेवकाने सांगितले.

स्लममध्ये आम्हाला अनेक लोकं सहकार्य करतात, मात्र इमारतींधील अनेक लोकं साधा दरवाजाही उघडत नसल्याचे ही त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर काही रहिवाशी शिवीगाळ करत आम्हाला पिटाळत असल्याचे ही त्याने पुढे सांगितले. या चाचणीत आपण जर पॉझिटिव्ह आलो तर पालिका अधिकारी आपल्याला प़कडून घेऊन जातील,  तसेच जबरस्ती क्वारांटाईन करतील असा चुकीचा गैरसमज काही लोकांमध्ये असल्याचे ही त्यांनी पुढे सांगितले.

BMC is focusing on spreading awareness about sero survey in non slum areas of mumbai

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.