मुंबई महापालिकेकडून नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. के वेस्ट वॉर्डकडून ही नोटीस देण्यात आलीय. मुंबई महापालिकेमार्फत (BMC) संबंधित कारवाई होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
२०१७ मध्ये नारायण राणेंच्या जुहू येथील अधिश नावाच्या बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार आली होती. या बंगल्याचे बांधकाम 'सीआरझेड'चे उल्लंघन असल्याबाबत तक्रार आरटीआय कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी दाखल केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस जारी केली आहे. (BMC gives notice to Narayan Rane bungalow in Juhu)
के-पश्चिम वॉर्ड (अंधेरी पश्चिम) च्या अधिकाऱ्याने यावर स्वाक्षरी केली आहे. अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये मालक/ताबाधारकाला जारी करण्यात आली. पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाच्या पथकाने शुक्रवारी जुहू तारा रोड येथील अधिश बंगल्याला भेट देऊन पाहाणी करणार असल्याचं या नोटीशीत नमूद करण्यात आलंय.
तर, बेकायदा बांधकामांच्या तक्रारीची पडताळणी करणार असल्याचं समोर आलं आहे. बंगल्याच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्यासाठी नोटीस देखील याआधी बजावण्यात आली होती.
सोमय्या आणि राणे फ्रंटलाईनवर
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर भाजपतर्फे सोमय्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उतवण्यात आलं आहे. नितेश राणेंना नुकताच दिलासा मिळालाय. त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. पण येत्या बृहन्मुंबई मनपा निवडणुका असल्याने राणे आणि सोमय्या यांच्यावर जबाबदारी असू शकते. सध्या दोन्ही नेते शिवसेनेने केलेल्या आरोपांना उत्तरं देत आहेत. त्यामुळे सोमय्या आलिबागला निघाल्यानंतर मुंबईत राणेंच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.