मुंबई : महानगरपालिकेने (BMC) आता आपत्ती व्यवस्थापनाचा (management) लोकल आराखडा तयार केला आहे. स्थानिक भागात कोणत्या आपत्ती (natural calamities) येऊ शकतात याचा अभ्यास करुन (study) स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण (local people training) देण्याबरोबरच विभाग कार्यालयात तशी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर महानगरपालिका भर देणार आहे. ( BMC has made management plan to protect from natural calamities-nss91)
मुंबईत इमारत कोसळणे,दरड कोसळणे समुद्र,तलावात बुडणे अशा आपत्ती आहेतच.त्याच बरोबर सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती म्हणून भुकंप गणला जातो.मुंबईत भुकंपाची दोष रेषाही आहे.तसेच,कारखानेही आहेत.या कारखान्यांमध्ये आपत्ती घडून जिवीत हानी होण्याची शक्यता असते.प्रत्येक प्रभागात कोणत्या प्रकारची आपत्ती ओढावू शकते याचा अभ्यास महापालिकेने केला आहे.त्यानुसार प्रभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते.तसेच,पावसाळ्या इमारत कोसळण्याची,दरड कोसळण्याची तसेच पाणी तुंबण्याचा धोका असतो.ज्या भागात ही संकट येण्याची शक्यता असते.त्या भागात तशी यंत्रणा सज्ज ठेवली जाते. "स्थानिक पातळीवर कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते याचा अभ्यास करण्यात आला आहे.त्यानुसार नियोजन करण्यात येते.तसेच,स्थानिक नागरीकांनाही त्याच प्रकारचे प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे'.असे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
भुकंपाचे मॅपिंग
मुंबईत विशेषत: पुर्व उपनगरात आणि पश्चिम उपनगरांच्या काही भागात भुकंपाची दोष रेषा आहे.जर मुंबईत भुकंप आल्यास कोणती आपत्ती ओढावू शकते.कोणत्या विभागाला जास्त फटका बसू शकतो याचा अभ्यास करण्यात आला आहे.त्यानुसार परीसरातील वैद्यकिय यंत्रणा,पोलिस ठाणी,मोकळी मैदाने,अग्निशमन केंद्र यांचे मॅपिंग करण्यात आले आहे.त्यामुळे गरजेनुसार यंत्रणा वापरणे,नियोजन करणे शक्य होणार आहे.
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर
मुंबईच्या भुकंप क्षेत्राचे सेस्मिक मायक्रोझोनेशन करण्यात आले असून त्सुनामी ऍटलास तयार करण्यात येणार आहे.भुकंप,त्सुनामी सारख्या आपत्तीच्या काळात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करुन यंत्रणा हाताळण्यात येणार आहे.सर्व यंत्रणा संगणकाच्या माध्यमातून काम करणार आहे.त्यामुळे मनुष्य तसेच वित्तहानी कमी करण्यास मदत होणार आहे.
लोकल मॅप काय आहे ?
मुंबईत तेल शुध्दीकरण कारखाने आहेत त्याच बरोबर दरडी कोसळण्याचा धोका आहे.दक्षिण मुंबईत इमारती कोसळण्याचा धोका असतो.तसेच,काही लहान मोठ्या कारखान्यांमध्येही आपत्ती घडण्याची भिती असते.यासाठी कोणत्या विभागात कोणते कारखाने आहेत,कोणती नैसर्गिक आपत्ती येऊ शकते याचा अभ्यास करण्यात आला आहे.या आपत्तीशी लढण्यासाठी त्या प्रकारची यंत्रणा स्थानिक पातळीवर तयार ठेवण्यात येते.
म्हणून नागरीकांना प्रशिक्षण
स्थानिक नागरीक हा कोणत्या आपत्तीत मदतीसाठी पहिल्यांदा पुढे येते.त्यांना मदतकार्यबद्दल प्राथमिक शास्त्रोक्त प्रशिक्षण असल्यास मनुष्य हानीचे प्रमाण कमी होऊ शकते.त्यासाठी महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागा मार्फत नागरीकांना प्रशिक्षण दिले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.